हिंगोली लोकसभा मतदारसंघ
हिंगोली (Hingoli) : हिंगोली सार्वत्रिक (LokSabha Election) लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने 94- हिंगोली विधानसभा मतदार संघातंर्गत एकुण 343 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले होते, त्यानुसार दि.25-04-2024 रोजी सदरील सर्व नियोजित मतदान केंद्रावर मतदान अधिकारी, कर्मचारी यांना निवडणूक साहित्य वाटप करुन रवाना करण्यात आले होते.
त्यानुसार काल नेमुण दिलेल्या (Hingoli Election) मतदान केंद्रावरील मतदानाचे सर्व कामकाज यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर हिंगोली शहरातील लिंबाळा येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे स्ट्राँग रुममध्ये सर्व बॕलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्ही.व्ही,पॕट व ईतर निवडणूक साहित्य जमा करण्यासाठी मतदान केंद्रावरील पढके (पोलींग पार्टी) परत आले. लोकशाहीच्या या उत्सवामध्ये महत्वपुर्ण भुमिका बजावल्याबद्दल सदर मतदान केंद्रावरिल पथकांचे कौतुक करण्यात आले. पुष्पवृष्टी करुन बँडद्वारे देशभक्तीपर संगीत वाजवुन वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. यावेळी (Hingoli Election) सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नवनाथ वगवाड, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सखाराम मांडवगडे,मुख्याधिकारी अरविंद मुंढे, अपर तहसिलदार हिमालय घोरपडे, सावित्री भुरे तसेच ईतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.