नवी दिल्ली (LokSabha) : लोकसभा निवडणूक 2024 साठी 7 पैकी दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता तिसऱ्या टप्प्यांतर्गत 7 मे रोजी मतदान होणार आहे. देशभरात 7 मे रोजी 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 94 जागांसाठी मतदान होणार आहे. या (LokSabha Election) मतदानाच्या दिवशी सुरक्षेच्या दृष्टीने शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. मतदान केंद्रासाठीही शाळांचा वापर करण्यात येतो. अशा परिस्थितीत शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत.
कोणत्या राज्यातील किती जागांवर मतदान
असामच्या 4 जागा, बिहारच्या 5 जागा, छत्तीसगडच्या 7 जागा, गोव्याच्या 2 जागा, गुजरातच्या 26 जागा, कर्नाटकच्या 14 जागा, मध्य प्रदेशच्या 8 जागा, महाराष्ट्राच्या 11 जागा , उत्तर प्रदेशच्या 10 जागांसाठी पश्चिम बंगालमधील 4, दादरा आणि नगर हवेली, 2 दमण आणि दीव आणि जम्मू-काश्मीरमधील 1 जागांवर (LokSabha Election) मतदान होणार आहे.
तिसरा टप्प्यात महाराष्ट्रातील या जिल्ह्यात मतदान
बारामती, रायगड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले.