लातूर (Elections 2024) : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर वाढत्या उन्हाबरोबर अधिकच वाढत असताना (BJP) भाजपाच्या जिल्हा प्रभारींना भाजपातील बंडाळीच्या ज्वराने घेरल्याचे दिसत असून मतदान अवघ्या काही दिवसांवर आले असताना या प्रभारींनी अरण्यरुदन सुरु केले आहे. (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लातुरात जाहीरसभा होऊन तीन दिवस उलटून गेले असतानाही जिल्हा प्रभारी अजूनही अवघा मतदारसंघ (BJP) भाजपामय झाल्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे मात्र नियतीलाच काँग्रेसची काळजी आहे, अशा अविर्भावात काँग्रेसचे नेते फिरत आहेत. त्यामुळे काँग्रेसची भिस्त नियती आणि काँग्रेसच्या नेत्यावर अवलंबून असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
मोदींची सभा म्हणजे विजयावर शिक्कामोर्तब
लातूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची सभा झाल्यानंतर लोकसभा मतदारसंघात (Elections 2024) वारे फिरले, अशी चर्चा भाजपाकडून सुरु केली गेली. मोदींची सभा म्हणजे भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब, अशी टॅगलाईनही फिरवली गेली. मात्र सोशल मिडियाच्या जमान्यात ही हवा केव्हाच प्याल्यातील वादळाप्रमाणे विरुन गेली. लातूरच्या राजकीय संस्कृतीला शोभेल, असा उमेदवार लातूरकरांना हवा, ही जनतेतून सुटलेली हवा काँग्रेसने पकडून ठेवण्याचा प्रयत्न चालविला असला तरी काँग्रेस ही हवा मतदान होईपर्यंत जखडून ठेवेल, तर काँग्रेसला या मतदारसंघात नियतीने साथ दिली, असे म्हणावे लागेल.
भाजपाच्या (BJP) उमेदवाराला बोलता येत असले तरी, भाषण करता येत नाही, हे उमेदवारी दाखल केल्यापासून ते (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेपर्यंत शृंगारे यांच्या भाषणातून जनमानसाने आजमावून घेतले आहे. शिवाय पाच वर्षांत मतदार संघात न फिरकल्याने सध्या जिल्हा प्रभारींवर अरण्यरुदनाची वेळ आलीय.
शृंगारेंची भूलथाप चर्चेची…
उमेदवारी दाखल करण्याच्या मुहूर्ताला आजी आमदारांना ‘माजी’ करणार्या सुधाकर शृंगारे यांनी (PM Narendra Modi) मोदींच्या भरसभेत मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचे श्रेय लाटत जिल्ह्यातील ७० टक्के लोकांना तेथे रोजगार मिळणार असल्याची भूलथाप दिली. सूज्ञ लातूरकर अशा अज्ञानी वक्तव्याचा कधीही स्वीकार व आदर करीत नाहीत.देश आणि राज्य नेतृत्वाचं पाठबळ लातूरच्या कार्यकर्त्यांना मिळाल्याने जनता भाजपाच्या पाठीशी आहे, असा जावईशोध प्रभारी किरण पाटलांनी लावल्याने लातूरच्या नेतृत्वाची पाटील बेकिंमत करतात की काय? हा सवाल आहे.
‘नियती’अन् नेत्यांवरच काँग्रेसची भिस्त
मराठीतून भाषणाचा उल्लेख कशासाठी
मराठीतून भाषणाचा उल्लेख कशासाठी
लातूरमध्ये मोदींची सभा ३० एप्रिल रोजी झाली. (PM Narendra Modi) मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली, हे सांगण्याचा प्रयत्न करीत प्रभारी पाटलांनी मराठा आरक्षणावर बोलायला हवे, असे लातूरकरांना वाटणे साहजिक आहे.