परभणी/चारठाणा(Parbhani) :- कार्तिक पौर्णिमेला तुळशी विवाह संपताच लग्न सोहळा सुरू होतो. तत्पूर्वी अनेकांची लग्न जुळलेली असतात. तर अनेकजण उपवर मुला मुलीसह स्थळ शोधण्याकरिता करिता सुरुवात करामतः परंतु या सर्व भानगडीत शेतकरी वत्यांची मुले मात्रउपेक्षित असलेले चित्र आहे, नोकरी करणाऱ्याना प्राधान्य दिले जात असले तरी सुशिक्षित व नोकरीच्या शोधात असलेल्या वराचे वय वाढत असून वधू मिळणे आव्हान होइत चालले आहे.
तुळशीचे लग्न उरकले ! ना, नोकरी, ना रोजगार, यंदा तरी कारभारी मिळेल का?
अलीकडे जोडीदार निवडताना मुलांना शेती हवी, जमीन हवी, मात्र शेतवारी नवरा नको आहे. त्यामुळे सामाजिक समस्यांची (Social problems) जटीलता वाढत चालली आहे. शिकलेल्या मुली व त्यांचे पालक आपापल्या मुलीसाठी शिकलेला व सरकारी नोकरी बांधलेले पर आणि थोडीफार शेती असल्यास मुलांना पसंती देत आहेत खासगी नोकरी आणि चांगला पगार असलेल्यांना दुय्यम स्थान दिले जात आहे: परंतु सुशिक्षित नोकरीच्या शोधात असलेल्या वधू शोधताना तारेवरची कसरत करावी लागत असून आव्हान होत चालले आहे. तसेच, वरांचे वाढते वय आणि घरच्यांसाठी चिंतेचा विषय बनला असून, अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक वधूच्या शोधात कुटुंबाची कसरत वाढत चालली असून यावर्षी तरी लग्न जुळणार का, हा प्रश्न नातेवाईकांकडून केला जात आहे.