हिंगोली (Mahavir Jayanti) : जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या २६२३ व्या जन्मकल्याणक महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दि 10 एप्रिल रोजी राम गल्ली येथील (Mahavir Jayanti) भगवान आदिनाथ दिगंबर जैन मंदिर येथून मिरवणूक काढून शहरातील प्रमुख मार्गाने महावीर भवन येथे समारोप करण्यात आला यावेळी समाज बांधव मोठ्या प्रणात हजर होते. मिरवूनकीत ढोल ताशे, लेजीम, अश्व असे अनेक प्रकारचे आकर्षण देखील होते.
या मिरवणूकीस आ. तानाजीराव मुटकुळे, आ. संतोष बांगर, माजी आ गजानन घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर आदीनी उपस्थिती दर्शविली या नंतर महावीर भवन येथे डॉ एस पि भारिल्ल यांचे ‘मे और मेरे महावीर’ या विषयावर सुंदर असे प्रवचन झाले. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकल (Mahavir Jayanti) दिगंबर जैन समाज मोठ्या प्रमानात उपस्तित होते.