रिसोड(Risod):- तालुक्यातील भोकरखेड येथील शेतकरी विष्णू दगडूजी लांडगे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळून इलेक्ट्रिक साहित्य व घराची वरील पॅराफीट वॉल पडल्या मुळे अंदाजे तीन ते चार लाखाचे नुकसान झाल्याची घटना 27 एप्रिलच्या रात्री घडली.
मागील एक ते दीड महिन्यापासून घर उन्हाळ्यातही वादळी वारा अवकाळी पाऊस (Unseasonal rain) काही पिच्छा सोडेना दिवसा पारा चाळीसच्या वर जातो तर रात्रीला अचानक वादळी वारा व पाऊस होत आहे. अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वारा व विजेच्या गडगडासह पावसाला सुरुवात होत आहे. काल दिनांक 27 एप्रिलच्या रात्री वातावरणात बदल होऊन सोसाट्याचा वारा व विजेच्या तालुक्यात पाऊस झाला. यावेळी भोकरखेड येथील शेतकरी विष्णू दगडू जी लांडगे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली यामध्ये टीव्ही पंखे फ्रिज यास इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झाले तसेच मागील एक वर्षांपूर्वी बांधलेल्या पक्क्या स्लॅबच्या घरावरील पॅरापिट वॉल कोसळली घराच्या भिंतीलाही तडे गेले असल्याचे शेतकरी विष्णू लांडगे यांनी यांनी सांगितले.
या घराचा इन्शुरन्स असून याबाबत मॅक्स लाइफ इन्शुरन्स (Max Life Insurance Co) कंपनीला कळविले असता कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मात्र उडवा उडवीची उत्तरे दिली व वरून नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास इन्शुरन्स मिळते असेही सांगितले झालेल्या नुकसानी मुळे शेतकरी मात्र कमालीचा धास्तावला आहे.