पातुर (Akola):- पातुर शहर व परिसरामध्ये भटक्या मोकाट कुत्र्यांनी हैदोस माजवला आहे, यावर प्रशासन फक्त बघायची व कागदोपत्री कामे केल्याची कसरत करत आहे, पातूर नगर परिषद हद्दी मध्ये येत असलेल्या खडकेश्वर वेटाळ येथील अल्पभूधारक शेतकरी (Farmer)चंदू गाडगे यांच्या घरात येऊन कुत्र्याच्या झुंडाने मारल्या दोन बकऱ्या. कुत्र्याच्या (Dogs) झुंडाने समोर बकऱ्या क्या अंगावर येत असताना परिवार काही करू शकला नाही मोकाट कुत्र्यांच्या आक्रमकतेसमोर परिसरातील नागरिक ही भयभीत झाले होते यावर नगरपरिषद प्रशासन करत आहे काय?
प्रशासनाला लोकांच्या जीवाची किंमत आहे का?
भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन,कुजलेल्या जनावरांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी नगरपालिका ची असते परंतु स्थानिक धनगर पुरा मधील संतोष बगाडे यांच्या घरासमोर तब्बल चार दिवसापासून कुत्रे सडून पडलेले असून सदर बंद घरातून कुणी एक कुत्रे नेण्याची तसदी घेतली नाही , यावर प्रशासनाने आतापर्यंत कुठली उपाययोजना केली अशी विचारणा पातूर शहरातील जनता करत आहे.