पण या बातम्यांच्या आड लपलेलं, वास्तव मात्र फार वेगळं असतं!
विनोद चिपडे
Love Affairs : “अल्पवयीन मुलगी पळवून नेली… विवाहितेला फसवून पळवले…” अशा प्रकारच्या बातम्या आजकाल सामान्य झाल्या आहेत. पण या बातम्यांच्या आड लपलेलं, वास्तव मात्र फार वेगळं असतं. अनेक प्रकरणांमध्ये संबंधित मुलगी किंवा महिला स्वेच्छेने तिच्या प्रिय व्यक्तीसोबत जात असते, त्याच्यावर प्रेम करत असते. मात्र, नंतर कोणत्यातरी अडचणीमुळे घरच्यांचा विरोध, सामाजिक दबाव, किंवा काही वेळा स्वतःची सोय, यामुळे तीच व्यक्ती अचानक फिर्यादी (तक्रारकरती) बनते, आणि त्या तरुणावर गंभीर गुन्ह्यांची नोंद (Crime Record) होते.
या प्रकरणांमध्ये खरा बळी ठरतो तो पुरुष (Male). त्याचं आयुष्य उध्वस्त होतं, नोकरी-व्यवसायाचे दरवाजे बंद होतात, सामाजिक प्रतिष्ठा धुळीत जाते. मी एसपी स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत (Senior Officers) संवाद केला असता, या विषयावर चर्चा करताना एका जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी मनात सल ठसवणारे वास्तव उघड केलं. “साहेब, कायदा तसा आहे, आम्ही काय करणार?” असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्यांना हे पूर्णपणे उमगलेलं होतं की, संबंधित मुलगी किंवा महिला तिच्या स्वेच्छेने त्या तरुणासोबत गेली होती. पण कायदा तिला ‘फिरता’ आहे. म्हणजे तक्रार करणारा अधिकार तिच्याकडेच आहे. त्यामुळे पोलीसही हतबल असतात.
पुरुषांचं मत– अन्याय होत असतानाही शांत :
अनेक युवकांशी संवाद साधताना कळतं की, त्यांच्यामध्ये याबाबत प्रचंड असंतोष आहे. प्रेम केलं, त्यावर विश्वास ठेवला, आणि त्याच प्रेमात फसवलं गेलं. या भावनेतून ते झुरत असतात. मात्र त्यांना समाजात ‘दोषी’ ठरवलं जातं. हे न्याय आहे का?
महिला संघटनांचं मत– अंतर्मनात स्वीकारलेलं वास्तव :
महिलांच्या बाजूने नेहमी उभ्या राहणाऱ्या काही संघटनांच्या अध्यक्षा यांच्यासोबत मी चर्चा दिले असता, त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे सांगितलं कि “हो, अशा प्रकरणांमध्ये अनेकदा महिलांचीच चूक असते. पण आम्ही काय करणार? आमच्यावरही जबाबदारी असते.” हे वक्तव्य पुरुषांच्या बाजूने एक मोठा आधार ठरू शकतं.
कायदा ही समाजातील दोन्ही बाजूंना समान न्याय देणारी व्यवस्था असावी. पण जर एकाच बाजूचा फायदा घेतला जात असेल, आणि दुसऱ्या बाजूचा बळी दिला जात असेल, तर तो कायदा (Law) काळानुसार बदलायला हवा.
महिला प्रेमातील निर्णयांची किंमत एकट्या पुरुषालाच का मोजावी लागते?
आज गरज आहे, ती अशी व्यवस्था उभी राहण्याची जी सत्य आणि न्यायाच्या बाजूने उभी राहील. मग ती व्यक्ती पुरुष असो की, महिला (Women) प्रेमातील निर्णयांची किंमत एकट्या पुरुषालाच का मोजावी लागते, हा प्रश्न आता आपण सर्वांनीच समाज म्हणून विचारायलाच हवा.