अमरावती (Lunar Foundation) : चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना सूर्य आणि पृथ्वी या मधोमध चंद्र आला की, हा चंद्र सूर्याला ज्याप्रमाणे काही वेळासाठी झाकतो, तेव्हा आपण त्याला ‘सूर्यग्रहण’ (lunar eclipse) असे म्हणतात. बहुदा सर्वच ग्रह कमी जास्त फरकाने सूर्याभोवती फिरत असतात. त्यामुळे रात्रीच्या आकाशात चंद्राचा मार्ग आणि ग्रहांचा मार्ग हा जवळपास एकसारखा आहे. परंतु जेव्हा एखादा ग्रह आणि चंद्र एकाच पातळीत येतो तेव्हा अशा प्रकारची (Lunar Foundation) घटना अनुभवता येते. त्याला पिधान असे म्हणतात. तसेच काहीसे येथे शनी सोबत घडणार आहे. अर्थात या ठिकाणी सूर्याऐवजी शनी या ग्रहाला पिधान होणार आहे.
शनि पृथ्वी पासून 793 दशलक्ष मैल म्हणजे 1.3 अब्ज किलोमीटर लांब आहे. या ग्रहाचा व्यास 116,460 किलो मिटर आहे. तर चंद्राचा व्यास 3,478 किलोमिटर असून पृथ्वीपासून3,82,144 किलोमीटर अंतरावर आहे. जरी शनी चंद्रापेक्षा मोठा असला तरी चंद्र जवळ असल्यामुळे पृथ्वीवरून (Lunar Foundation) चंद्रबिंब मोठे तर शनी दूर असल्यामुळे त्याचे बिंब लहान दिसते. त्यामुळे शनि चंद्राच्या मागे पूर्णपणे झाकला जाणार आहे.
24 जुलैच्या रात्री चंद्र सुमारे 80% प्रकाशित असेल, या वेळी चंद्र स्वतः कुंभ नक्षत्रात (कुंभ राशीत) असणार आहे. लंबवर्तुळाकार मार्गाने पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणारा चंद्र 24 जुलै रोजी रात्री 11.11 वाजता त्याचे सर्वात जवळच्या अंतरावर म्हणजे ‘पेरीजी’ ओलांडतो, तेव्हा (Lunar Foundation) ही घटना सुरू होणार आहे. खगोल निरीक्षकांनी (Astronomer) शनिबिंब चंद्राबिंबाच्या मागे जाण्याच्या वेळेच्या किमान 30 मिनिटे आधी निरीक्षण सुरू करावी आणि संपूर्ण घटना क्रम किती वेळ चालतो आणि संपतो याची नोंद करावी. ही संपूर्ण घटना 30 मिनिटे सुरु राहणार आहे. चंद्राद्वारे शनीला ग्रहण ही एका साखळीचा भाग आहे, जे साधारणपणे दर 18 महिन्यांनी 4 वर्षांच्या अंतराने होते.
या पुढील घटना 21 ऑगस्ट रोजी होणार असून, ते भारतातून दिसणार नाही. या घटनेमुळे आकाश निरीक्षक आणि (Astronomer) खगोलशास्त्रज्ञांना खगोलीय पिंडांच्या वेगाचा अभ्यास करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे ही घटना पाहण्याची अनुभवण्याची संधी मिळणे कठीण आहे. परंतु आकाश निरभ्र राहिल्यास नक्कीच अनुभवता येणार आहे. अशी माहिती (Marathi Science Council) मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली आहे.