नवी दिल्ली (New Delhi) : लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Election) दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांतील एकूण 88 जागांवर मतदान झाले. या टप्प्यात बहुतांश राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी चांगली होती. मात्र, पहिल्या टप्प्याच्या वेळी कमी लोक मतदानासाठी बाहेर पडले. दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर (PM Modi) पंतप्रधान मोदींनी आपल्या प्रतिक्रियेत दुसरा टप्पा अतिशय चांगला असल्याचे सांगितले आणि निवडणूक (NDA) एनडीएच्या बाजूने असल्याचे सांगितले.
दुसऱ्या टप्प्यातील मतदान (Second phase Election) पूर्ण झाल्यानंतर (PM Modi) पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर पोस्ट केली. ज्यामध्ये त्यांनी म्हटले की, दुसरा टप्पा खूप चांगला होता. मतदान करणाऱ्या भारतभरातील जनतेचे आभार. (NDA) एनडीएला जो अभूतपूर्व पाठिंबा मिळत आहे, तो विरोधकांना आणखी निराश करणार आहे. मतदारांना एनडीएकडून चांगले प्रशासन हवे आहे. तरुण आणि महिला मतदारांना (NDA)एनडीएला भक्कम पाठिंबा हवा आहे.
मतदारांचे आभार व्यक्त करताना (PM Modi) पंतप्रधान म्हणाले की, तरुण आणि महिला मतदार एनडीएला भक्कम पाठिंबा देत आहेत. 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर पंतप्रधानांनी असाच दावा केला होता आणि सत्ताधारी आघाडीला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले होते. संपूर्ण भारतातील लोक (NDA) एनडीएला विक्रमी संख्येने मतदान करत आहेत, असे (PM Modi) पंतप्रधान मोदी म्हणाले.