परभणी/गंगाखेड (Parbhani):- तालुक्यातील सुरळवाडी शिवारात कालव्यामध्ये ३० वर्षीय युवकाचा मृतदेह (Dead Body)सप्टेंबर २०२४ मध्ये आढळला होता. या प्रकरणी सुरुवातीला गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. सदर प्रकरणात मयताच्या पत्नीने न्यायालयामध्ये(Court) दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशाने २९ जानेवारीला रात्री आरोपीवर गंगाखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाच्या आदेशाने परभणीतील गंगाखेड पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल
मनिषा परकड यांनी तक्रार दिली आहे. त्यांचे पती विठ्ठल परकड वय ३० वर्ष यांचा खून (Murder)झाला आहे. सदर प्रकरणात प्रसाद धारबा देवकते याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मनिषा यांचे पती विठ्ठल हे हरवल्याची तक्रार ६सप्टेंबर २०२४ ला सासर्याने गंगाखेड पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणात बेपत्ताची नोंद झाली. त्याच दरम्यान १३ सप्टेंबरला विठ्ठल परकड यांचा मृतदेह सुरळवाडी शिवारातील कालव्यात आढळला. त्यानंतर गंगाखेड पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. याचा तपास सुरू असताना मनिषा यांनी त्यांच्या पतीला आरोपीने सोबत नेऊन दारु पाजून जुन्या भांडणाच्या कारणावरुन खून केला आहे, अशी तक्रार करत न्यायालयात दाद मागितली.
सदर प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोउपनि. बोडके करत आहेत.