Madhyapradesh :- मध्यप्रदेशातील अलीराजपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरात पाच जणांचे मृतदेह (dead body) लटकलेल्या अवस्थेत आढळले.
पती, पत्नी आणि तीन मुलांचे मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. ही हत्या की सामूहिक आत्महत्या(suicide)? एफएसएल आणि शवविच्छेदन(Autopsy) अहवालानंतरच हे स्पष्ट होईल. पोलीस आता एफएसएल टीमची वाट पाहत आहेत. या घटनेने दिल्लीतील बुरारी येथे त्याच दिवशी म्हणजेच 1 जुलै 2018 रोजी घडलेल्या घटनेची आठवण करून दिली आहे.