जयस्तंभ चौकातील स्मारकस्थळी राजमाता जिजाऊंची महाआरती
बुलढाणा (Rajmata Jijau) : अखंडलक्ष्मीअलंकृत, राजश्री राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक जिजाऊ माँसाहेब यांच्या ४२७व्या जयंतीनिमित्त बुलढाणा येथील जयस्तंभ चौकातील बालशिवबासह (Rajmata Jijau) राष्ट्रमाता जिजाऊंच्या स्मारकस्थळी धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) व त्यांच्या विविध पत्नी तथा माजी नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड यांच्याहस्ते भव्य महाआरती करण्यात आली.
विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सुत्रात गुंफ़ुन स्वराज्याचे जनआंदोलन उभं करणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे जीवनचरित्र अत्यंत प्रेरणादायक असल्याचे मल यांनी सांगून, (Rajmata Jijau) राजमाता जिजाऊ मासाहेब जिजाऊ यांचे प्रेरण स्तोत्र असल्याचे ते म्हणाले.
आज १२ जानेवारी रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील बुलढाणा शहरांमध्ये धर्मवीर आमदार शसंजुभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून पूर्णत्वास आलेल्या जयस्तंभ चौकातील भव्य पुर्णाकृती (Rajmata Jijau) राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या स्मारक स्थळावर समस्त जनतेला ४२७ व्या जिजाऊ माँसाहेब जन्मोत्सवाच्या निमित्याने धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) तसेच पूजाताई संजय गायकवाड यांच्याहस्ते भव्य महाआरती संपूर्ण झाली. यावेळी त्या ठिकाणी युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्यासह बुलढाणा शहरातील असंख्य माता-भगिनी तसेच शिवप्रेमी जिजाऊप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर आ. गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी उपस्थित (Rajmata Jijau) जिजाऊप्रेमींशी संवाद साधला.