महसूलच्या चौकशीमध्ये प्रकार उघड
हिंगोली (Maha E Seva Kendra) : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील (Maha E Seva Kendra) महा-ई-सेवा केंद्रासाठी मंजुरी एका गावाची असताना सेवा केंद्र दुसऱ्या गावात सुरू असल्याची महसूल विभागाच्या तपासणीमध्ये आढळून आले आहे. या प्रकरणाचा अहवाल शुक्रवारी ५ जुलै रोजी (Kalmanuri Tehsil Office) कळमनुरी तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. यावरून आता महा-ई-सेवा केंद्र चालकावर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील एका कॅफे मधून ठिकाणी नागरिकांना लागणारे (Revenue Inquiry) महसूल विभागाची विविध प्रमाणपत्रे दिली जातात. मात्र या ठिकाणी सेवा केंद्राचा वापरण्यात आलेला कोड कळमनुरी तालुक्यातील इतर गावाचा असल्याची तक्रार करण्यात आली होती. या संदर्भात कळमनुरी तालुक्यातील कान्हेगाव येथील अविनाश वाघमारे व दीपक वाघमारे यांनी तहसील कार्यालयाकडे सविस्तर तक्रार करून लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे तक्रारी नमूद करण्यात आले. त्यामुळे (Tehsil Office) तहसीलदार सुरेखा नांदे यांनी तातडीने चौकशी करण्याचे आदेश मंडळ अधिकारी शिल्पा सरकटे यांना दिले होते.
त्यानुसार ५ जुलै रोजी मंडळ अधिकारी शिल्पा सरकटे, तलाठी गोविंद भोरगे यांनी कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे जाऊन चौकशी केली. यावेळी त्यांनी तक्रारदाराचे जवाबही नोंदवले. यामध्ये तक्रारदारांनी महा ई सेवा केंद्र कडून आर्थिक पिळवणूक करण्यात आल्याचे नमूद केले. तसेच सदर (Maha E Seva Kendra) महा-ई-सेवा केंद्राचा आयडी क्रमांक मसोड येथील असल्याचे जवाबात सांगितले. त्यानंतर या पथकाने महा-ई-सेवा केंद्र चालकाचाही जवाब नोंदवला. केंद्र चालकानेही त्यांच्या जवाब मध्ये महा-ई-सेवा केंद्राचा आयडी क्रमांक दुसऱ्या गावचा असल्याचे सांगितले.
दरम्यान या चौकशीनंतर आता मंडळ अधिकारी शिल्पा सरकटे यांनी सविस्तर अहवाल तयार केला. सदर अहवाल तहसील कार्यालयाकडे पाठविला आहे. या अहवालावरून संबंधित (Maha E Seva Kendra) महा ई सेवा केंद्र चालकावर कारवाई होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. या संदर्भातील निर्णय सोमवारी ८ जुलै रोजी घेतला जाणार असल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान जिल्ह्यामध्ये तब्बल 2000 पेक्षा अधिक महा सेवा केंद्र सुरू असून यापैकी ग्रामीण भागात मंजूर झालेली महा सेवा ही केंद्र प्रत्यक्षात ज्या ठिकाणी मंजूर झाली त्या ठिकाणी न सुरू करता शहरी भागात सुरू करण्यात आल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वच (Maha E Seva Kendra) महा-ई-सेवा केंद्राची चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे.