जनतेचा अपेक्षाभंग, सोयाबीन, धानाला भाव नाही: विजय वडेट्टीवार
नागपूर (Vijay Wadettiwar) : आज महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार पार पडत आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालनंतर राज्यात महायुतीचे सरकार आले. विदर्भाचे मुख्यमंत्री झाल्यावर नागपूरात पहिले अधिवेशन असताना, वैदर्भीय जनतेचा अपेक्षाभंग महायुती सरकारने केला आहे. अधिवेशन कालावधी कमी असल्याने (Vijay Wadettiwar) विजय वडेट्टीवार यांनी ही टीका केली आहे.
विदर्भातील मुख्यमंत्री झाल्यावर नागपूरात जास्त काळाचे अधिवेशन असेल, अशी वैदर्भीय जनतेची अपेक्षा
एकीकडे शेतकरी आत्महत्या होत आहे, सोयाबीन, धान कापसाला हमीभाव मिळत नाही. विदर्भात खूप मोठे प्रश्न आहेत, पण त्याला या सरकारने हरताळ फासला आहे. त्यामुळेच शेतकरी विरोधी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय (Maha Vikas Aghadi) महाविकास आघाडीने घेतल्याचे (Vijay Wadettiwar) विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात संविधानाची विटंबना झाली. यानंतर आंबेडकरी जनतेने आंदोलनं केले पण त्यातही कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. अनेक कार्यकर्त्याना मारहाण झाली, धरपकड करण्यात आली. त्यातही एक कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, हे संतापजनक आहे, असे (Vijay Wadettiwar)) विजय वडेट्टीवार म्हणाले.
बीड मध्ये एका सरपंचाचे अपहरण करून त्याची निर्घृणरित्या हत्या करण्यात आली. ह्यातील आरोपीला राजकीय वरदहस्त आहे. खून करणाऱ्या आरोपीला राजकीय आश्रय देणारे आज मंत्री केले जाते, त्यामुळे या खुनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे (Vijay Wadettiwar) वडेट्टीवार म्हणाले.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी (Maha Vikas Aghadi) महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते जितेंद्र आव्हाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू, महेश सावंत, ज. मो.अभ्यंकर हे उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेला महाविकास आघडीच्या नेत्यांनी संबोधन केले.