पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री योगी यांच्याशी केली चर्चा
प्रयागराज (Mahakumbh 2025) : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात आज एका तंबूला आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी धूर वेगाने वर येत असल्याचे पाहिले. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या. (Mahakumbh 2025) आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मदतकार्य सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही, परंतु या घटनेमुळे काही काळ जत्रेत घबराट पसरली.
Fire at #MahaKumbhMela2025 | Uttar Pradesh CM Yogi Adityanath took cognizance of the fire incident that took place in the #MahaKumbhMela2025, in Prayagraj. Fire tenders are present at the spot and have been brought under control. Senior officers are present on the spot on the…
— ANI (@ANI) January 19, 2025
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी उपस्थित
परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. उत्तर प्रदेशचे (CM Yogi) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज येथील (Mahakumbh 2025) महाकुंभ मेळा 2025 मध्ये लागलेल्या आगीच्या घटनेची दखल घेतली. सीएमओने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी उपस्थित आहेत आणि आग आटोक्यात आणण्यात आली आहे. (CM Yogi) मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.”
#WATCH | Uttar Pradesh | A fire breaks out in a chemical warehouse in Kanpur's Dada Nagar industrial area. Fire tenders are at the spot. More details awaited pic.twitter.com/rgoqoPbwMQ
— ANI (@ANI) January 19, 2025
मेळ्यातील आगीच्या घटनेची माहिती देताना प्रयागराजचे डीएम रवींद्र कुमार म्हणाले की, “सेक्टर 19 मधील गीता प्रेसच्या तंबूत दुपारी 4.30 वाजता आग लागली. काही वेळातच आग जवळच्या 10 तंबूंमध्ये पसरली. पोलिस आणि प्रशासन टीम घटनास्थळी पोहोचली आहे. आग विझवण्यात आली आहे. कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे.”
#WATCH | Prayagraj | Uttar Pradesh CM Yogi Adityanath says, "All the people of the administration are working to fulfil the vision of PM Modi for Maha Kumbh…Mauni Amavasya snan on the 29th of January and Basant Panchami snan on February 3 are the important days of the… pic.twitter.com/LqVWU8JgkV
— ANI (@ANI) January 19, 2025
महाकुंभमेळ्याचे (Mahakumbh 2025) डीआयजी वैभव कृष्णा म्हणाले की, “गीता प्रेसच्या तंबूत आग लागली. कोणत्याही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. आगीमुळे झालेले नुकसान जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले जात आहे. आग आटोक्यात आणण्यात आली आहे. फक्त तंबू आणि काही सामान जळाले.”
प्रयागराज झोनचे एडीजी भानू भास्कर म्हणाले की, “महाकुंभमेळ्याच्या सेक्टर 19 मध्ये दोन-तीन सिलेंडर स्फोटांमुळे कॅम्पमध्ये मोठी आग लागली. आग आटोक्यात आणण्यात आली आहे. सर्वजण सुरक्षित आहेत आणि कोणतीही जीवितहानी झालेली नाही.”
#WATCH | Fire at #MahaKumbhMela2025 | Uttar Pradesh CM Yogi Adityanath arrives at the fire incident spot in the #MahaKumbhMela2025
The fire has been brought under control. No causality has been reported. pic.twitter.com/dkXQrTRMPj
— ANI (@ANI) January 19, 2025
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाकुंभ मेळा 2025 मध्ये लागलेल्या आगीच्या घटनेच्या ठिकाणी पोहोचले. आग आटोक्यात आणण्यात आली आहे. कोणत्याही जीवितहानीबद्दल माहिती आलेली नाही.