हिंगोली (Mahalok Adalat) : येथे शनिवारी महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये अँड. सुरेश गडदे यांनी चालविलेले 60 प्रकरणे तडजोडी अंतिम निकाल काढण्यात आले. ज्यामध्ये सावरखेडा येथील 28 लाख रुपयाचा दावा निकाली काढण्यात आला आहे.
हिंगोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात 14 डिसेंबर रोजी (Mahalok Adalat) महालोक अदालतीचे आयोजन केले होते. यामध्ये अँड. सुरेश गडदे यांनी चालविलेले साठ प्रकरणे तडजोडी अंती निकाली काढण्यात आले. ज्यामध्ये सावरखेडा येथील गंगासागर सरकटे यांचा एक वर्षाच्या आत मधील 28 लाख रुपयाचा दावा तडजोडीअंती निकाली काढण्यात आला. या दाव्याचा 28 लाख रुपयाचा धनादेश न्यायाधीश आर. व्ही.लोखंडे, आणि न्यायाधीश एस. एन.माने- गाडेकर व पक्षकाराचे वकील अँड. सुरेश गडदे कंपनीचे वकील अजय व्यास, अँड. उपाध्ये यांनी इफको टोकियो इन्शुरन्स कंपनीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
अँड. सुरेश गडदे यांचे साठ प्रकरणे निकाली निघाल्यामुळे जिल्हा सत्र न्यायाधीश आर. व्ही. लोखंडे, न्यायाधीश एस. एन. माने -गाडेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे पक्षकारांनी अँड. सुरेश गडदे यांचे आभार मानले अँड. सुरेश गडदे यांना इन्शुरन्स कंपनीकडून अँड. अजय व्यास, अँड. सुभाष वाघमारे अँड. उपाध्ये, अँड. विपिन अर्धापूरकर, अँड. मनीषा गडदे, अँड. पवन मस्के,अँड. बालाजी जगताप,अँड. दीपक लेकुळे, गुनाराव पोले, कानिफनाथ दिंडे, राम भुमरे, विशाल लोणकर, देवराव कंठाळे, यांनी मोलाचे सहकार्य केले.