मानोरा (Mahant Babusingh Maharaj) : बंजारा काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी शक्तीपिठाचे महंत बाबुसिंग महाराज राठोड (Mahant Babusingh Maharaj )यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषदेचे सदस्य ( आमदार ) पदी निवड झाली आहे. मंगळवारी सकाळी त्यांनी दि. १५ ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे विधान परिषद सदस्यपद नियुक्तीची शपथ घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहरादेवीत ५ ऑक्टोंबर रोजी बंजारा विरासत लोकार्पण सोहळ्याला आले असता बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबुसिंग महाराज (Mahant Babusingh Maharaj) यांची भेट घेतली होती. त्यानंतर घडलेल्या घडामोडीत भाजपाकडून त्यांची विधान परिषदेत आमदार म्हणून निवड होवून आमदारकीची शपथ घेतली. ६३ वर्षीय बाबुसिंग महाराज राठोड यांचे शिक्षण बि. ए. पर्यंत झाले आहे. शपथ विधिनंतर त्यांनी जय गोर बंजारा, जय श्रीराम, जय सेवालाल, जय रामराव बापूचा नारा दिला. नवनियुक्त आमदार धर्मगुरु बाबुसिंग महाराज (Mahant Babusingh Maharaj) यांच्यावर देशभरातील गोर बंजारा समाज बांधवाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.