पुसद (Mahapanchnama YouTube channel) : नाईक परिवारातील युवा नेते माजी जिप उपाध्यक्ष ययाती मनोहर नाईक यांची सोशल मीडियावर (Mahapanchnama YouTube channel) महापंचनामा युट्युब चॅनेल च्या संचालकाने दि. 11जून रोजी रात्री दरम्यान खालच्या पातळीवर जाऊन व्यक्तिगत अपमानजनक बदनामीकारक टीका केली होती. याचे तीव्र पडसाद दुसऱ्या दिवशी सकाळी शहरात उमटले दि. 12 जून रोजी ययाती नाईक (Yayati Naik) यांच्या समर्थकांनी एकत्र येऊन उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी (Pusad Police) यांना निवेदन दिले. व कारवाईची मागणी केली होती.
ययाती नाईक समर्थकांकडून निवेदन
महापंचनामा युट्यूब चॅनल चे (Mahapanchnama YouTube channel) संचालक सतीश शेवाळकर यांनी ययाती नाईक यांच्याविरुद्ध (social media) सोशल मीडियावर बदनामीनकारक लिखाण केल्या प्रकरणात वसंतनगर पोस्टे मध्ये ग्रामपंचायत सदस्य राहुल सहारे रा. श्रीरामपूर यांच्या तक्रारी वरून भादवि ३८४,२९४,५०६ गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास (Pusad Police) वसंतनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमदार चंदेलवाड करीत असून सतीश शेवाळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर वसंतनगर पोलीस ठाण्यात फिर्यादी ययाती नाईक यांचे स्वीय सहाय्यक अरविंद बाबूसिंग चव्हाण यांनी सायंकाळी 6 वाजता महापंचनामा यूट्यूब चैनल चे संचालक सतीश शेवाळकर यांनी 50 हजार रुपयाची खंडणी मागितल्याची फिर्याद दिली. यावरून ठाणेदार शांतीकुमार पाटील यांनी भादवी 384 नुसार गुन्हा दाखल केला.
एकाच दिवशी तीन गुन्हे दाखल
अरविंद चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 50 हजार रुपयाची खंडणीची मागणी करून व ती न दिल्यास (social media) सोशल मीडियावर ययाती नाईक (Yayati Naik) यांची बदनामी करून अर्जदारास भेटून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. 9 जून रोजी हॉटेल दीपसंध्या मध्ये युवा नेते ययाती नाईक (Yayati Naik) यांची पत्रकार परिषद झाली असता यूट्यूब चॅनलचे (Mahapanchnama YouTube channel) संचालक सतीश शेवाळकर यांनी सदर बातमी एडिट करण्यासाठी व इतर कामासाठी 50 हजार रुपयाची लाच मागितली. त्यानंतर वारंवार फोन करून त्रास देत आहेत. दिनांक 11 जून रोजी नाईक बंगल्याच्या बाहेरील गेट जवळ दुपारी 3 वाजता दरम्यान सतीश शेवाळकर आले व पैशाची मागणी करू लागले. पैसे नाही दिले तर बदनामी करणारच असे म्हणून ते निघून गेले. व त्यानंतर त्यांच्या स्वतःच्या फेसबुक अकाउंट महापंचनामा न्यूज या अकाउंट वरून फेसबुक वरील ययाती नाईक यांच्या पेजवर बदनामी कारक पोस्ट टाकने सुरू केले.
पुसद मधील राजकारण तापलं पण ययाती पेक्षा शांत स्वभावाचे इंद्रनील नाईक (Indranil Naik) कधीही 100% चांगले आहेत. त्यांनी त्यांचा जनसंपर्क वाढवावा. आम्हा पत्रकारांना सरकारकडून काही पगार मिळत नाही. एखाद्याला (YouTube channel) यूट्यूब चॅनलची सिस्टीम चालवण्यासाठी पैसे मागितले तर आम्ही काय पाप केले? ययाती नाईक माझ्या फेसबुकच्या पोस्ट शेअर करत आहे. हा बालिशपणा बंद करा ते तुमचे 10 चेलेचपाटे बाजूला करा आणि स्पष्ट बोला. ययाती नाईक यांच्या चलेचपट्ट्यांनी सतीश शेवाळकर ला पोकळ धमक्या देऊ नये असे मी जाहीर आवाहन करतो. जास्तीत जास्त तुम्ही माझा खून कराल, आम्ही बरोबर प्लॅन करून संपवू. टकल्या तू औकातमध्ये राहुन भाष्य कर. माझ्या पोस्टवर आयडिया शेअर करायला लागला. काय तर म्हणे सतीश शेवाळकरन पैसे मागितले. तर सांग टकल्या तू श्रीमंत आहे म्हणून टकल्या तुला पैसे पाहिजे असेल तर सांग टकल्या अशा घाणेरडे शब्दात महापंचनामा यूट्यूब चॅनल सतीश शेवाळकर यांनी चे संचालक अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बदनामीकारक पोस्ट टाकल्या.
तर तिसरा गुन्हा डॉ. भानू प्रकाश कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये दिनांक 11 जून रोजी पाच वाजताच्या दरम्यान आरोपी यूट्यूब चॅनलचे संचालक सतीश शेवाळकर यांनी जाऊन डॉ. भानुप्रकाश कदम यांना वीस हजार रुपयांची मागणी केली, डॉ भानुप्रकाश कदम यांनी सदर व्यक्तीला ती रक्कम दिली. मात्र त्यामध्येही त्यांचे समाधान झाले नाही डॉ. भानू प्रकाश कदम यांच्या गल्ल्यात हात टाकून व त्यांच्या हाताला झटका मारून पैसे लुटण्याचा प्रकारही यूट्यूब चैनल च्या सतीश शेवाळकर यांनी केला. याप्रकरणी डॉ. भानुप्रकाश कदम यांचे सुपुत्र आशिष कदम यांनी तातडीने (Pusad Police) शहर पोलीस स्टेशन गाठात सोबत जालना मध्ये घडलेल्या सिटी फुटेजचे डीव्हीआर घेऊन ठाणेदार समक्ष बसल्यानंतर सर्व दाखवल्यानंतर फिर्याद दिली की. सदर आरोपीने 20 हजार रुपयांची खंडणी घेऊन, वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली, अशा फिर्यादीवरून विविध कलमान्वये (YouTube channel) यूट्यूब चैनल चे संचालक सतीश शेवाळकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. अत्यंत खेदजनक घडलेला प्रकार असंच म्हणावे लागेल.