कुरखेडा (maharaj Procession) : कुंभार समाज बांधव कूरखेडा यांचा वतीने श्रीसंत शिरोमणी गोरोबा काका यांची प्रभाग क्रमांक ११ येथे मुर्तीचे प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम दूपारी संपन्न झाला तर दि ५ मे रविवार रोजी रात्री ८ वाजता संत गोरोबा महाराजांचा तैलचित्राची वाजत गाजत शहरातून भव्य मिरवणूक (maharaj Procession) काढण्यात आली. सोबतच श्री संत गोरोबा काका महाराज (Saint Shiromani Goroba Maharaj) यांच्या आभासी द्रुष्टांत देखावा लक्ष वेधून घेत होते. कुरखेडा येथील प्रभाग क्र. ११ येथे समस्त कुंभार समाज बांधव यांचे वतीने श्री संत शिरोमणी गोरोबा काका महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त नविन मंदिराचे बांधकाम करीत श्री संत शिरोमणी गोरोबा काका महाराज यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा शिवसेना जिल्हा प्रमुख (उ.बा.ठाकरे गट) सुरेंद्र सिंह चंदेल यांचे हस्ते करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना तालुका अध्यक्ष आशिषभाऊ काळे, कॉंग्रेस पार्टी चे तालुकाध्यक्ष जिवन पाटील नाट, नगराध्यक्षा अनिता बोरकर, उपाध्यक्ष बबलुभाई हुसैनी, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा अध्यक्ष वामनराव फाये कवियत्री संगीता ठलाल, नगरसेविका कांताताई मठ्ठे, जयश्री रासेकर,पुंडलिक नेवारे महाराज, नगरसेवक अशोक कंगाले सह समाज बांधव, महिला भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन भोयर यांनी तर आभार प्रदर्शन विनोद बुरबांधे यांनी केले.रात्री समाजाचा वतीने कूंभार मोहल्ला, हनुमान मंदिर, बाजार पेठ, आंबेडकर चौक मस्जिद चौक ते पून्हा कूभार मोहल्ला या मार्गे महाराजांचा तैलचित्राची भव्य मिरवणूक (maharaj Procession) काढण्यात आली. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थीत होते