मुंबई (Maharashtra Assembly Election 2024) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेनेने राज्यभरातील 45 जागांसाठी पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाचाही या यादीत समावेश आहे. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे निवडणूक लढवणार आहेत.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेना पक्षाने बुलढाणामधून संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांना उमेदवारी दिली आहे. तर अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना सिल्लोडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय (Maharashtra Assembly Election) छत्रपती संभाजीनगर पश्चिममधून संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मालेगाव बाह्य मतदारसंघातून दादाजी भुसे यांना तर ओवळा-माजिवडामधून शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रताप सरनाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय शिवसेनेने परंडामधून नताजी सावत, सावंतवाडीतून दीपक केसकर, भायखळ्यातून यामिनी दाधव आणि पाटणमधून शंभूराज देसाई यांना उमेदवारी दिली आहे.
Shiv Sena releases a list of 45 candidates for the upcoming #MaharashtraAssemblyElections2024
CM Eknath Shinde to contest from Kopri-Pachpakhadi Assembly constituency
Sada Sarvankar fielded from Mahim against Raj Thackeray's son Amit Thackeray pic.twitter.com/HdVhJEfawM
— ANI (@ANI) October 22, 2024