फडणवीस सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन गाजणार
नागपूर (Maharashtra Assembly) : आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु झाले असून, पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजनेवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. माहिती सरकार मधली ही महत्वकांक्षी योजना आहे. विधान परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ही रांगोळी काढण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने चार बाय सहा अशी रांगोळी साकारण्यात आली. तसेच आज (Maharashtra Assembly) सभागृहात नवनिर्वाचित मंत्री आणि सदस्यांचा परिचय करुन दिला जाणार आहे. फडणवीस सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन अनेक मुद्द्यांनी गाजणार आहेत.
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा!
राज्यगीताच्या प्रेरणादायी सुरांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन 2024चा प्रारंभ…#Maharashtra #Nagpur #WinterAssemblySession2024 pic.twitter.com/4UiSj7ZQyS
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 16, 2024
महायुतीमधील काही मंत्र्यांवर अजूनही ईडीच्या केसेस प्रलंबित
महायुतीमधील काही मंत्र्यांवर अजूनही ईडीच्या केसेस प्रलंबित आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar), प्रताप सरनाईक, हसन मुश्रीफ, आणि धनंजय मुंडे यांच्या नावाचा त्यात समावेश आहे. त्यांच्यापैकी कोणावरही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. क्लोजर रिपोर्टही अजून दाखल करण्यात आलेला नाही.
'बेस्ट'च्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना…
(विधानपरिषद, नागपूर | दि. 16 डिसेंबर 2024)#Maharashtra #Nagpur #WinterAssemblySession2024 pic.twitter.com/fahqrfMePC
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 16, 2024
छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने समर्थकांचे आंदोलन
छत्रपती संभाजी नगर-नाशिक राज्य मार्गावर विंचूर येथे रास्ता रोको आंदोलन: माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे समर्थक व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून, छत्रपती संभाजी नगर-नाशिक राज्य मार्गावर विंचूर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. छगन भुजबळांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली जात असून अर्धा तास रस्ता रोको आंदोलन केल्याने वाहतूक कोंडी झाली. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या. (Chhagan Bhujbal) भुजबळांना योग्य सन्मान न दिल्यास यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बीड आणि परभणी येथील घटनांवर गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट केले की, संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार सभागृहात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. राज्य घटनेचा अपमान… https://t.co/KrmBmyW1dc
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 16, 2024
राज्यात गंभीर घटना घडत आहेत, सरकारनं उत्तर द्यायची तयारी दाखवावी: नाना पटोले
परभणी, बीडमधील घटना सरकार आल्यानंतर घडल्या आहेत, गंभीर घटना घडत आहेत. सरकाने उत्तर द्यायची तयारी दाखवावी, अशी मागणी (Nana Patole) नाना पटोले यांनी केली. परभणीतील आंदोलन (Parbhani Violence) दरम्यान अटकेत असलेला आरोपीचे मृत्यू प्रकरणाचे सोलापुरात मोठा पडसाद देण्यात आला. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांकडून निषेध आंदोलन करण्यात आले. न्यायालयीन कोठडीत मृत झालेल्या सूर्यवंशीला न्याय द्या, अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली.
नवनिर्वाचित आणि नामनिर्देशित सदस्यांचा सभागृहास परिचय करून देताना…
(विधानपरिषद, नागपूर | दि. 16 डिसेंबर 2024)#Maharashtra #Nagpur #WinterAssemblySession2024 pic.twitter.com/AF0o48VUay
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 16, 2024
संजय कुटेंना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक
भाजपा नेते संजय कुटे (Sanjay Kute) यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज कार्यकर्ते जाब विचारण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी कूच करणार आहेत. आमदार संजय कुटे (Sanjay Kute) पाच वेळा निवडून आले तरी मंत्रिपद न मिळाल्याने जळगांव जामोद मतदार संघातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत.