आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांची विधानसभेत मोठी मागणी
मुंबई (Maharashtra Assembly) : विदर्भातील कोळी समाजाला मागास जात प्रमाणपत्र दिले जात नाही राज्यातील अन्य भागातील (Koli reservation) कोळी बांधवांना ते दिले जाते. त्यामुळे कोळी समाजाला जात प्रमाणपत्र मिळावे. तसेच (Dhangar community) धनगर समाजालाही अनुसूचित जमातीमध्ये मध्ये आरक्षण द्यावे, अशी जोरदार मागणी काँग्रेसच्या नेत्या आणि आमदार ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी आज विधानसभेत केली.
विधानसभेत विविध प्रश्नांवर चर्चा सुरू असताना मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न चर्चेला आणण्यात आला. यावेळी बोलताना आमदार ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या की, मुस्लिम समाजाला कसे आरक्षण देता येईल आणि ते न्यायालयात कसे टिकेल याबाबत सरकारने कार्यवाही करण्याची गरज आहे. मात्र त्याच सोबत राज्यातील कोळी बांधवांना जात प्रमाणपत्र दिले जात असताना, विदर्भातील कोळी बांधवांना मात्र जात प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळे विदर्भातील (Koli reservation) कोळी बांधवांना जात प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारने ताबडतोब निर्णय घ्यावा. तसेच (Dhangar community) धनगर समाजाला सध्या राज्यात भटक्या आणि विमुक्त या प्रवर्गातून आरक्षण दिले जात आहे. अन्य राज्यांमध्ये हे आरक्षण अनुसूचित जमातीमधून दिले जाते. त्यामुळे राज्यातील धनगर समाजालाही अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी जोरदार मागणी ॲड. ठाकूर (Yashomati Thakur) यांनी आज विधानसभेत केली.