महाराष्ट्र बंद आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे
मानोरा (Maharashtra Bandh) : ठाणे जिल्हयातील बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिरात शिकणाऱ्या चार वर्षाच्या दोन मुलीवर शाळेतील एका नराधम कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची संताप जनक घटना घडली आहे. या अनानवी कृत्या विरोधात राज्यभरात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे. राज्यातील महिलावरील अत्याचार आणि महीला सुरक्षेच्या मुद्यावर असंवेदशील सरकार विरोधात (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीच्या दि. २४ ऑगस्ट रोजी (Maharashtra Bandh) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंद मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी देवानंद पवार व वरीष्ठ जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेखार पटेल यांनी दिली आहे.
त्या दोन मुलीवर अत्याचार झाले ती शाळा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक लोकांशी संबंधित आहे. सत्ताधारी लोकांशी संबंधित लोक यामध्ये सहभागी असल्याने पोलीस प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पिडीत मुलीच्या आईची तक्रार दाखल करून घेण्याऐवजी पोलीसांनी त्या गरोदर मातेला अकरा तास पोलीस स्टेशनला बसवून ठेवले. हे पोलीस आणि सरकारच्या गलथान कारभाराचे आणि संवेदनशिलतेचे ज्वलंत उदाहरण आहे. राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांच्या जिल्हयात माता, भगिनी महीला सुरक्षित नाही, तर राज्यातील इतर भागात कायदा व सुव्यवस्था कशी असेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.
२० ऑगस्ट रोजी या घटनेच्या विरोधात संतप्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणात (Badlapur Case) बदलापूर मध्ये आंदोलन करून रेल रोको केला. पण सरकारकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक नागरिकांनी हे प्रकरण लावून धरल्याने सरकारला नाईलाजाने कारवाईला सुरूवात करावी लागली. राज्यभरात मोठ्या प्रमाणात महीला आणि मुलीवर अत्याचार सुरू आहेत. सरकार आणि पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. महीला व मुलींना सुरक्षित वातावरण देण्यास सरकार पुर्णपणे अपयशी ठरला आहे. बदलापूरच्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. सरकारला वठणीवर आणण्यासाठी (Mahavikas Aghadi) महविकास आघाडीने (Maharashtra Bandh) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंद मध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.