डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय
अमरावती (Maharashtra Baseball Association) : श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट, अमरावती द्वारा संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, उत्तम नगर, अमरावती येथील विद्यार्थी (Aniket Pise) अनिकेत पिसे याला (Maharashtra Baseball Association) महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन तर्फे बेस्ट प्लेयर अवार्ड ने सन्मानित करण्यात आले. ट्रस्टचे सचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कमलाकर पायस यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुनिल कुमार हे विविध क्रीडा प्रकारात उत्तमोत्तम खेळाडू घडविण्याचे कार्य करतात.
या (Maharashtra Baseball Association) प्रसंगी महाविद्यालयाचे डॉ. वर्षा गावंडे, डॉ. श्याम तंत्रपाळे, डॉ. रजनी गेडाम, डॉ. शुध्दोधन कांबळे, डॉ. प्रदीप अंबोरे, डॉ. आर. एम. देशमुख, डॉ. एस. बी. सांगोले, डॉ. ओमप्रकाश बोबडे, प्रा. दिपाली पडोळे, डॉ. डी. एस. धाकडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. प्रकाश बोरकर, प्रा. अनिल धोटे, प्रा. प्रवीण विधाते, प्रा. शंकर लाहोटी, प्रा. राजेश बोराडे, प्रा. हर्षवर्धन देशमुख , डॉ. ज्ञानेश्वर भगत, प्रा. अनिल पाचकुडके, प्रा. रुद्रा चोपकर, प्रा. सिमरन देशमुख, प्रा. ज्योती टाले, प्रा. भागवत, प्रा. बजाज, प्रा. अढाऊ, प्रा. बनसोड, प्रा. मेघा चिमनकर तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी विजय इंगळे, राजेश नाखले, किशोर बिजवे, सुशांत युवनाते, भाग्यश्री वानखडे, सागर सिरसाट यांनी उत्कृष्ट बेसबॉल खेळाडू (Aniket Pise) अनिकेत पिसेचे कौतुक केले. याप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.