मुंबई (Maharashtra Bhagyashree Yojana) : महाराष्ट्र सरकारने मुलींचे भविष्य उंचावण्यासाठी विशेष योजना सुरू केली आहे. असाच एक उपक्रम म्हणजे माझी कन्या भाग्यश्री योजना 1 जानेवारी 2016 रोजी सुरू करण्यात आली. या (Bhagyashree Yojana) योजनेअंतर्गत कुटुंबात जन्मलेल्या प्रत्येक मुलीसाठी 50,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मुलींना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करणे, हा या योजनेचा उद्देश आहे. महाराष्ट्रातील अनेक रहिवासी या उपक्रमाचा लाभ घेत आहेत.
असा करा अर्ज
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी (Bhagyashree Yojana) अर्ज करण्यासाठी (Maharashtra Admin) महाराष्ट्र प्रशासन विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. चुका टाळण्यासाठी अर्ज डाउनलोड करा आणि काळजीपूर्वक भरा. कोणत्याही चुकीमुळे अर्ज रद्द होऊ शकतो. फॉर्म भरल्यानंतर, आवश्यक कागदपत्रांसह महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडे जमा करा.
या प्रक्रियेद्वारे, कुटुंबांना मुलीच्या जन्मावर 50,000 रुपयांची मदत मिळते. दोन पर्यंत मुली असलेल्या कुटुंबांना या (Bhagyashree Yojana) योजनेचा लाभ घेता येणार आहे. मात्र, तिसरी मुलगी जन्माला आल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही. कुटुंबांना त्यांच्या मुलींचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करण्यात मदत करणे, हा या योजनेचा उद्देश आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना (Bhagyashree Yojana) ही महाराष्ट्रातील मुलींच्या सक्षमीकरणाच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे. आर्थिक सहाय्य देऊन, सरकार कुटुंबांसाठी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करेल आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देईल, अशी आशा आहे.