विज्ञान शाखेत होते सर्वात जास्त ७.६ लाख विद्यार्थी
पुणे: महाराष्ट्र बोर्डाने इयत्ता 12 वीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. निकाल उद्या म्हणजेच 21 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन प्रसिद्ध होईल. निकाल जाहीर होताच, परीक्षेत सहभागी झालेल्या 14 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल तपासता येतील. यावर्षी एचएससी बोर्डाची परीक्षा 2 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत घेण्यात आली होती. विज्ञान शाखेत सर्वात जास्त ७.६ लाख विद्यार्थी परीक्षेत बसले होते.
14 लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी
बोर्डाच्या परीक्षेत 14 लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थी व पालकवर्ग अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वरून निकाल पाहू शकतील . गुणपत्रिकेची एक प्रत डाउनलोड करून पाहता येणार आहे.