भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांचे टिकास्त्र
मुंबई (Maharashtra Budget) : राज्यात लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) मविआला थोडे यश मिळाले त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारच्या खोट्या नरेटिव्हवर आपल्याला जिंकता येते असा फाजील आत्मविश्वास त्यांच्या मनात निर्माण झालाय. त्याला चोख उत्तर देण्याचा प्रयत्न कामाच्या माध्यमातून महायुती सरकारने केला आहे, असे टिकास्त्र भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी अर्थसंकल्पीय भाषणावेळी विरोधकांवर केले. तसेच (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडी तीन तिघाडा काम बिघडा अशा प्रकारची आहे. तर आमची महायुती (Mahayuti) म्हणजे विकासाची त्रिमूर्ती समजून काम करताना दिसत असल्याचेही दरेकर म्हणाले.
अर्थसंकल्पावर बोलताना दरेकर (Pravin Darekar) म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला विशेषतः युवा, महिला, शेतकरी, उपेक्षित वंचितांना न्याय देणारा (Maharashtra Budget) अर्थसंकल्प महाराष्ट्रातील जनतेच्या हिताकरिता मांडला गेला आहे. या सभागृहात आया-बहिणींवरून शिव्या देणाऱ्यांनी आया-बहिणींसाठी नेमके काय केलेय हे वाचावे, शिकावे. खोटे नरेटिव्ह सेट करणाऱ्यांचे थोबाड बंद करणारा हा अर्थसंकल्प आहे. खोट्यानाट्या आरोपांचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात ज्या तरतुदी केल्या आहेत त्यावरून दिसून येईल.
दरेकर (Pravin Darekar) पुढे म्हणाले की, एक ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय सरकारने भगिनींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या (CM Ladki Bahin Yojana) माध्यमातून घेतलाय. त्याचे स्वागत व्हायला पाहिजे. कारण विरोधकांच्याही बहिणींना, त्यांच्या पक्षाच्या बहिणींना हा लाभ होणार आहे. त्याचे कौतुक सोडा त्यात चुका काढण्याचे प्रयत्न केले गेले. परंतु राज्यातील महिलांनी या योजनेचे अभूतपूर्व स्वागत केले आणि विरोधकांचे खोटे नरेटिव्ह पसरविण्याच्या प्रयत्न धुवून काढला गेला. तसेच हा वारकरी संप्रदायाला मानणारा महाराष्ट्र आहे. कधीनव्हे तो वारकऱ्यांच्या दिंडीला २० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. तो निर्णयही विरोधकांच्या पोटात दुखला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अटल सेतूवर गेले. अटल सेतू आणि अप्रोच रोडच त्यांना कळत नाही. अप्रोचरोडला भेगा गेल्या होत्या त्यांनी सांगितले अटलसेतूला भेगा गेल्यात, असा टोलाही (Pravin Darekar) दरेकरांनी पटोले यांना लगावला.