तुमसर (Bhandara) :- जिल्ह्यात १० सप्टेंबर रोजी सकाळ पासुन मुसळधार पावसाला (Heavy rain) सुरुवात झाली. संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पुर आला आहे. वैनगंगा व बावनथडी नद्या दुथड्या भरून वाहत आहेत. तर पुजारी टोला, बावनथडी, संजय सरोवर, भिमगड, या सरोवरातुन नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याने वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलाडली असुन कारधा लहान पुलावरुन पाणी वाहत आहे. तर तुमसर तालुक्यातील भंडारा -तुमसर- बालाघाट राष्ट्रीय महामार्गावरील बावनथडी नदीच्या बपेरा पुलावरुन दोन फुट पुराचे पाणी (flood water) वाहत असल्याने महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्याचा संपर्क तुटला आहे. परिणामी येथिल जनजीवन विस्कळित झाले आहे. व वाहतूक पुर्णतः बंद करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने नदी काठावरील नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तालुक्यातील नदीकाठावरील शेकडो हेक्टर शेतीपिक पाण्याखाली
तालुक्यातील अनेक गावाना नदी व नाल्याच्या पूरांच्या पाण्याने वेढले आहे.सदर पुराच्या पाण्याने तालुक्यातील बपेरा, तामसवाडी,पा़ंजरा, बाम्हणी उमरवाडा, कोष्टी, बाम्हणी ,सुकळी,रोहा, आदी गावातील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर शेती व धानपिक पाण्याखाली गेले असल्याने शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या अस्मानी व सुल्तानी संकटात सापडला आहे. तालुक्यातील सुकळी-रोहा मांढळ या गावांना जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने सदर मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.व बाम्हणी गावांला पुराच्या पाण्याने वेढले आहे.तर रेंगेपार येथे पुराचे पाणी गावात शिरले आहे. संजय सरोवर ,भिमगड, धापेवाडा, पुजारीटोला,येथिल धरणातुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीत करण्यात आला आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. भंडाऱ्याला जोडणारा ब्रिटिश कालीन जुना कारधा पूल पुराच्या पाण्या खाली गेला आहे.सदर पुलावरून पाणी वाहत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व प्रशासन अलर्ट मोडवर येत नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
शेकडो हेक्टर धानपिक शेती पाण्याखाली
मागील दिवसांपासून तालुक्यातसह जिल्ह्यात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक नदी व नाल्यांना पुर आला आहे. तुमसर तालुक्यातून वाहत गेलेल्या वैनगंगा व बावनथडी नदी काठावरील गावातील नागरिकांची शेकडो हेक्टर शेतजमीन आहे. बावनथडी व वैनगंगा नदीचा संगम होत असतो. सदर दोन्ही नद्यांचा पुराच्या पाण्याने बपेरा, तामसवाडी , कोष्टी,बाम्हणी,सुकळी, ढोरवाडा, पांजरा,चारगाव, रोहा आदी गावातील शेत शिवारातील शेकडो हेक्टर शेती जमीन व धानपिक,व भाजीपाला पीक पाण्याखाली आले आहेत. परिणामी येथिल शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात निसर्गाच्या अस्मानी व सुल्तानी संकट ओढवले असुन आर्थिक संकटात सापडला आहे.
बाम्हणी गावाला वैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्याने वेढले
तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले बाम्हणी गावाला वैनगंगा नदीच्या पुराने वेढले आहे.सदर पुराचे पाणी गावातील मुख्य चौकात, मंदिर परिसरात, व येथिल नागरिकांच्या घरात सुध्दा दोन फुट पाणी शिरले आहे. परिणामी येथिल जनजीवन विस्कळित झाले आहे.