नागपूर (Sudhir Mungantiwar) : महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार काल नागपुरात राजभवनात पार पडले. नव्या मंत्रिमंडळात महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यादरम्यान अनेक जुन्या नेत्यांना डावलण्यात आले. यामध्ये जेष्ठ नेते छगन भुजबळ आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांचाही समावेश आहे.
आज झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, केंद्राने सुधीर मुनगंटीवार यांच्याबाबत काहीतरी विचार करुनच मंत्रिमंडळात घेतले नसेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर सुधीर मुनगंटीवार यांनी संवाद साधताना आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले. पण यावेळी त्यांनी ‘कालपर्यंत नाव असताना, नाव कमी का केले?, याबाबत शंका व्यक्त केली.
यह सिर्फ निरे मूर्खता है!
जब भी कांग्रेस पार्टी हारती है, तो आत्मचिंतन करने की जगह किसी और चीज पर ठीकरा फोड़ती है।
(मीडिया से संवाद | नागपुर | 16-12-2024)#Maharashtra #Nagpur pic.twitter.com/pOQJiQirYy
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 16, 2024
“मी नाराज असण्याचे कारण नाही. मी कधीच व्यथित होत नाही. पक्ष जे पद देते त्या पदासाठी मी काम करतो. फक्त इतकीच इच्छा आहे की, मंत्रिमंडळात माझे नाव आहे, असे सांगण्यात आले आणि काल ते नव्हते इतकाच मुद्दा आहे. कालपर्यंत नाव असताना ते नाव कमी का केले, हे मला माहिती नाही. बाकी मला याबद्दल काही माहिती नाही. मंत्री म्हणून मी कॅबिनेटमध्ये मी गोरगरिंबाचे विषय मांडायचे, आता विधानसभेत मांडेन,” असे (Sudhir Mungantiwar) सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
“जेव्हा मी आणि चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा मुख्यमंत्री म्हणून प्रस्ताव दिला, तेव्हा श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिला होता. तेच मार्गदर्शन आता करण्यात आले आहे,” “मी नाराज कधीच राहत नाही. काल जे आपल्याकडे होते ते उद्या जाणार आहे. उद्या आपल्याकडे नाही ते परवा येणार आहे याची मला जाणीव आहे. ज्यांच्या कुटुंबातील मुलगा दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर उभा राहतो, आपण त्यांना मंत्री करु शकतो. आणि मी एका निष्ठावान कार्यकर्त्यासाठी गेलो म्हणून माझ्यावर राग काढतील. पक्ष असा संकुचित विचार कधीच करत नाही”, असे (Sudhir Mungantiwar) सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.