शिंदेंना मिळणार कोणती खाती?
मुंबई (Maharashtra Cabinet Expansion) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या नागपुरात पार पडणार आहे. भाजपने तयार केलेल्या सत्तावाटपाचा फॉर्म्युला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी मान्य केल्याची माहिती आहे. आता मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारापूर्वी नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांचा पक्ष शिवसेनेला काय मिळणार आणि शिवसेनेच्या कोणत्या आमदारांना (CM Devendra Fadnavis) फडणवीस मंत्रिमंडळात मंत्री केले जाणार?, याबाबत शक्यता बांधली जात आहे.
महाराष्ट्र मंत्रिमंडळात (Maharashtra Cabinet) मुख्यमंत्र्यांसह एकूण मंत्र्यांची संख्या 43 असण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे 22 नेते, 12 शिवसेना आणि 10 राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समावेश होण्याची खात्री आहे. (CM Devendra Fadnavis) फडणवीस मंत्रिमंडळात शिवसेनेला 12 मंत्रीपदे दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आठ कॅबिनेट मंत्री आणि चार राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
#मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेनेच्या मुंबईतील सर्व खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक गुरुवारी मुंबईतील रामटेक बंगल्यावर पार पडली.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल सर्व नवनिर्वाचित आमदार, पदाधिकारी तसेच… pic.twitter.com/CvU49IRirm
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 13, 2024
शिंदे यांना मिळणार कोणती खाती?
एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्याकडे गृह आणि महसूल खाती देण्यास तयार नसल्यामुळे प्रस्तावित (Maharashtra Cabinet) खात्यांच्या वाटपाबाबत एकनाथ शिंदे यांच्यात असंतोष असल्याच्या बातम्या आल्या होत्या, जो वादाचा विषय बनला आहे. मात्र, आता एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी भाजपच्या अटी मान्य केल्याचा दावा केला जात आहे. नगरविकास खाते शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेनेतून कोण मंत्री होणार?
माहितीनुसार, शिवसेनेच्या गटातून (Maharashtra Cabinet) कॅबिनेट मंत्रिपदासाठी संभाव्य नावे समोर आली आहेत. त्यात उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, गुलाबराव पाटील, आशिष जैस्वाल, अर्जुन खोतकर आणि भरत गोगावले यांचा समावेश आहे. याशिवाय योगेश कदम, विजय शिवतारे, राजेंद्र यड्रावकर किंवा प्रकाश आबिटकर हे राज्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात.