मुंबई (Maharashtra CM Devendra Fadnavis) : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील लाडक्या बहिणींसाठी (Ladki Bahin Yojana) मोठी घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होताच मागील महायुतीच्या काळात सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करण्याची घोषणा केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आणि महायुती सरकारने महाराष्ट्राच्या “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने” चा निधी वाढवण्याचे आश्वासन दिले होते. जी आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच पूर्ण केली आहे. आपल्या शपथविधी समारंभानंतर पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी आनंदाची बातमी दिली की, राज्यातील (Ladki Bahin Yojana) लाडक्या बहिणी, ज्यांना या योजनेंतर्गत पूर्वी 1500 रुपये मिळत होते, त्यांना आता 2100 रुपये मिळणार आहेत.
#WATCH | Mumbai: On the opposition's allegation that industries are moving from Maharashtra to Gujarat, CM Devendra Fadnavis says, "We have repeatedly replied to the opposition with data. Today I will tell you another new thing that 90% of the FDI we got last year, we have got in… pic.twitter.com/y55a90itOL
— ANI (@ANI) December 5, 2024
मुख्यमंत्री फडणवीस यांचे योजनेबाबत आश्वासन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या 2014 च्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाची आठवण करून देत महाराष्ट्राच्या विकासासाठी निर्धाराचा संदेश दिला. फडणवीस यांनी आश्वासन दिले की, त्यांचे प्रशासन राज्यभरात मूलभूत सुविधा पुरविण्यावर भर देईल, ज्यात शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह वीजपुरवठा आणि नदीजोड प्रकल्प पुढे नेण्यात येईल.
जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करणार
“आपला महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असेल. आम्ही विरोधकांचाही आदर करू आणि जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करू.” महाराष्ट्राने गेल्या अडीच वर्षात मिळवलेली गती त्यांच्या नेतृत्वाखाली आणखी गतीमान होईल, असे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
सरकारच्या खात्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की…
यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पोर्टफोलिओ अंतिम झाल्याचे आत्मविश्वासाने जाहीर केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि अजित पवार (Ajit pawar) यांच्याबाबत ते म्हणाले की, भूमिका बदलल्या असल्या तरी महायुतीची आघाडी आजही तितकीच मजबूत असून महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही एकत्र काम करू. “मुख्यमंत्री सहायता निधीतून कर्करोगग्रस्तांना मदत देण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी करण्याचा मी आज पहिला निर्णय घेतला आहे, असेही फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.