कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागाच्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती पुस्तिका प्रकाशित
मुंबई (Maharashtra CM Eknath Shinde) : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत गेल्या दोन वर्षात राबवण्यात आलेल्या (Maharashtra Skill Development) विभागाच्या विविध उपक्रमांची व योजनांच्या ‘कौशल्य युक्त महाराष्ट्र, रोजगार युक्त महाराष्ट्र’ माहिती पुस्तिकेचे प्रकाशन (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) आणि मंत्रिमंडळातील सर्व उपस्थित मंत्री उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की,देशाचा विकास गतीने होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात अनुभवी, कार्यक्षम,सर्जनशील कुशल मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवा पिढीला कौशल्य युक्त बनवण्यासाठी कौशल्य विकासाच्या उपक्रमांना दिलेल्या प्राधान्याचा उल्लेख केला. याप्रसंगी कौशल्य विकास विभागाच्या सर्व विभागातील अधिकारी यांना सोबत घेवून सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करून रोजगार निर्मिती साठी प्रभावी अंमलबजावणी केली याबद्दल मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
कौशल्य विकास विभागात नाविन्यपूर्ण उपक्रम
कौशल्य विकास विभागामार्फत (Maharashtra Skill Development) गेल्या दोन वर्षात चांगले उपक्रम राबवले आहेत. कौशल्य युक्त व बेरोजगार मुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये देखील व्यावसायिक शिक्षणाला अधिक महत्त्व देण्यात आले असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी म्हणाले. रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम, बेरोजगारांच्या सहकारी सेवा संस्थांना आर्थिक सहाय्य योजना, करिअर विषयक साहित्य,डिजिटल अभ्यासिका व वेबसाईट विकास योजना, मॉडेल करिअर सेंटर,आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थांशी सामंजस्य करार, आंतरराष्ट्रीय रोजगार केंद्राच्या माध्यमातून परदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, आदिवासी उमेदवारांसाठी रोजगार व स्वयंरोजगार नोंदणी,प्रशिक्षण व मार्गदर्शन, राज्यातील इच्छुक उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे मंत्री लोढा (Mangalprabhat Lodha) म्हणाले.