मुंबई (Maharashtra Election 2024) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने (BJP) तिसरी यादी जाहीर केली आहे. या (Maharashtra Election 2024) यादीत विदर्भातून 13 उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. मुर्तिजापूरमधून हरिश पिंपळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कारंजामधून सई डहाके, तिवसामधून राजेश वानखेडे, आर्वीमधून सुमित वानखेडे, काटोलमधून चरणसिंग ठाकूर, सावनेरमधून आशिष देशमुख, नागपूर मध्य – प्रवीण दटके, नागपूर पश्चिममधून सुधाकर कोहले, नागपूर उत्तर – मिलिंद माने, साकोलीमधून अविनाश ब्राह्मणकर आणि चंद्रपूरमधून किशोर जोरगेवार यांना संधी देण्यात आली आहे.
भाजपा की केंद्रीय चुनाव समिति ने आगामी महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024 के लिए अपनी तृतीय सूची में निम्नलिखित नामों पर स्वीकृति प्रदान की है। pic.twitter.com/CEupQanXi2
— BJP (@BJP4India) October 28, 2024
विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Election 2024) उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. भाजपच्या (BJP) यादीत लातूर शहरमधून अर्चना पाटील चाकूरकर तर चंद्रपूर किशोर जोरगेवार यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे किशोर जोगरेवार यांनी एकच दिवसापूर्वी भाजपात प्रवेश केला होता. भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून दुसरी 22 उमेदवांची दुसरी यादी जाहीर केली आहे. (BJP) भाजपने जारी केलेल्या तिसऱ्या यादीत आमदार राम सातपुते यांच्या नावाचा समावेश आहे.
भाजप पक्षाची तिसरी यादी
१ . मुर्तिजापूर – हरिश पिंपळे
२ . कारंजा – सई डहाके
३ . तिवसा -राजेश वानखेडे
४ . मोर्शी – उमेश यावलकर
४ . आर्वी – सुमित वानखेडे
५ . कटोल – चरणसिंग ठाकूर
६. सावनेर – आशिष देशमुख
७ . नागपूर मध्य – प्रवीण दटके
८. नागपूर पश्चिम – सुधाकर कोहले
९ . नागपूर उत्तर – मिलिंद माने
१ ० . साकोली – अविनाश ब्राह्मणकर
१ १ . चंद्रपूर – किशोर जोरगेवार
१ २ . आर्णी – राज तोडसाम
१ ३ . उमरखेड – किशन वानखेडे
१ ४ . देगलूर – जितेश अंतापूरकर
१ ५ . डहाणू – विनोद मेढा
१ ६ . वसई – स्नेहा दुबे
१ ७ . बोरीवली – संजय उपाध्याय
१ ८ . वर्सोवा – भारती लव्हेकर
१ ९ . घाटकोपर पूर्व- पराग शाह
२ ० . आष्टी – सुरेश धस
२ १ . लातूर शहर -अर्चना चाकूरकर
२ २ . माळशिरस – राम सातपुते
२ ३ . कराड उत्तर – मनोज घोरपडे
२ ४ . पलुस कडेगाव – संग्राम देशमुख