धुळ्यात पंतप्रधान मोदींची गर्जना
धुळे (Maharashtra Election 2024) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या निवडणूक प्रचाराचा एक भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात नऊ सभा घेणार आहेत. ज्याची सुरुवात (PM Modi) पंतप्रधान मोदींनी आज शुक्रवारी धुळे येथून केली.
धुळ्यातील सभेला संबोधित करताना पीएम मोदींनी (PM Modi) विरोधी महाविकास आघाडीची खिल्ली उडवली आणि त्यांच्या गाडीला चाके आणि ब्रेक नसल्याचे सांगितले. भाजप आणि महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला तुमच्या आशीर्वादाची गरज असल्याचे ते म्हणाले. गेल्या अडीच वर्षांत देशाची जी प्रगती झाली आहे, ती तुम्ही थांबू देऊ नका. आपण सर्व मिळून (Maharashtra Election 2024) महाराष्ट्राच्या विकासाला पुढे नेऊ आणि येत्या पाच वर्षात महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेऊ.
#WATCH | Dhule, Maharashtra: Addressing a public rally, PM Narendra Modi says, "BJP, Mahayuti, and each candidate of Mahayuti needs your blessings. The speed of development in Maharashtra in the last 2.5 years will be continued. We will take the growth of Maharashtra to new… pic.twitter.com/w9pA4VyAsU
— ANI (@ANI) November 8, 2024
यासोबतच पीएम मोदी (PM Modi) म्हणाले की, राज्यात आवश्यक ते सुशासन फक्त महायुती सरकारच देऊ शकते. MVA च्या गाडीला ना चाके आहेत, ना ब्रेक आणि ड्रायव्हरच्या सीटवर कोण बसणार? यावरून भांडण चालू आहे. पीएम मोदी म्हणाले की, MVA आघाडीच्या राजकारणाचा उद्देश लोकांना लुटणे आहे. जेव्हा MVA सारखे लोक सरकार बनवतात, तेव्हा ते प्रत्येक सरकारी धोरण आणि विकासात अडथळा आणतात. आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळातील महाविकास तुम्ही पाहिला आहे.
आघाडीच्या लोकांपासून प्रत्येक महिलेने सावध राहावे
काँग्रेस पक्ष आणि आघाडीचे लोक महिलांवर कसा अत्याचार करतात, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. विविध अशोभनीय कमेंट करून ते महिलांचा अवमान करण्याचा प्रयत्न करत आहे. (Maharashtra Election 2024) आघाडीच्या लोकांच्या अशा कृत्यांना महाराष्ट्रातील मुली, माता, भगिनी कधीच माफ करू शकत नाहीत. यासोबतच महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला आघाडीच्या लोकांपासून सावध राहावे लागेल, असे (PM Modi) पीएम मोदी म्हणाले.