मुंबई (Maharashtra election Results 2024) : महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha election Results) अंतर्गत निवडणुक पार पडली आहे. (Maharashtra election Results) महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांवर, भाजप 15 जागांवर, काँग्रेस 6, शिंदे यांची शिवसेना 9 आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना 8, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर होते. निकालाच्या आकडेवारीनुसार, महायुती आघाडी 17 जागांवर, तर महाआघाडी 30 जागांवर आघाडीवर आहे. विदर्भात भाजप 02, काँग्रेस 05, शिंदे 01, ठाकरे 01, शरद पवार गट 01 या जागांवर विजय मिळवला आहे. या (Election Results) निवडणुक निकाल जाहीर झाला असून, कोणत्या मतदारसंघात कोणाचा विजय झाला, जाणून घेऊया…
येथे CLICK करा : नितीन गडकरींचा नागपुर मतदारसंघातून रंजक विजय
– महाराष्ट्रातील हायप्रोफाईल सीट नागपूर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री (Nitin Gadkari) नितीन गडकरी यांचा विजय निश्चित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील हॉट सीट नागपूरची लोकसभा निवडणूक खूपच रंजक झाली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून मा.नितीन गडकरी यांचा विजय झाला असून, ते 109841 मतांनी विजयी झाले आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) आघाडीवर असून, त्यांचा विजय निश्चित करण्यात आला आहे.
येथे CLICK करा : सुप्रिया सुळे यांचा धडाकेदार विजय
बारामती मतदारसंघ
– महाराष्ट्रातील बारामती मतदारसंघातून (Supriya Sule) सुप्रिया सुळे यांचा धडाकेदार विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार महाराष्ट्रातील पवार कुटुंबाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या (Baramati election Results) बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक (Election Results) लढत होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबात फूट पडली आणि मेहुण्यांनी खासदार वाहिनीचा पराभव केला.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ
– चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात कॉंग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) विजयाला गवसणी घातल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. काँग्रेस कार्यकर्ते मतमोजणी केंद्राबाहेर ढोलताष्याच्या गजरात जल्लोष साजरा करताना दिसत आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर जवळपास 2 लाख 59 हजार 692 इतक्या विक्रमी विजयी झाल्या आहेत. धानोरकर यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र लोकसभा क्षेत्राचे निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी प्रदान केले.
अमरावती लोकसभा मतदारसंघ
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत 07-अमरावती मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार बळवंत बसवंत वानखडे विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांनी हा निकाल जाहीर केला. उमेदवार वानखडे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी सामान्य निरीक्षक सी.जी. रजनीकांथांन तसेच मतमोजणी निरीक्षक अंजना पंडा उपस्थित होत्या.
नांदेड लोकसभा मतदारसंघ
– नांदेड लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार (Vasantrao Chavan) वसंतराव चव्हाण 58 हजार 195 मतांनी विजयी झाले (Election Results) आहेत. 17 व्या फेरीत 9 हजार 775 मतानी काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण हे आघाडीवर असल्यामुळे, नांदेड शहरात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोष साजरा केला. काँग्रेस पक्षाचे उमेदवार नांदेडमध्ये आघाडीवर असल्यामुळे काँग्रेस व महाविकास आघाडीच्या वतीने जल्लोष साजरी केला.
वाशिम-यवतमाळ मतदारसंघ
– वाशिम – यवतमाळ मतदारसंघातून संजय देशमुख (Sanjay Deshmukh) यांचा विजय झाला. महाआघाडीच्या कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे.
वर्धा लोकसभा मतदारसंघ
– वर्धा मतदारसंघातून अमर काळे यांचा विजय झाला असून, जनतेने आशीर्वाद देऊन त्यांना निवडून दिले आहे. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवाराला (Election Results) निवडून दिले आहे. अमर काळे यांनी जनतेने दिलेल्या आशीर्वाद त्याकरिता मतदारांचे आभार मानले.
लातूर लोकसभा मतदारसंघ
– लातूर लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे (Dr. Shivaji Kalge) हे जवळपास पंचेऐंशी हजार मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांनी मित्र पक्ष तसेच डॉक्टर सेल व महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाचे आभार मानले. कॉंग्रेसच्या नेत्यांनी समाजसेवा करण्याची तिकिट देऊन संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख यांचे व कार्यकर्ते यांचे या (Election Results) विजयामुळे आभार मानले आहेत.
हिंगोली लोकसभा मतदारसंघ
– हिंगोली लोकसभा मतदारसंघात हा महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाचे (Nagesh Patil Ashtikar) नागेश पाटील आष्टीकर विजयी झाले आहेत. फक्त अधिकृत घोषणा उर्वरित आहे. एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने महायुतीचे बाबुराव पाटील कोहळीकर यांच्यावर विजय (Election Results) मिळविला असून, ठाकरे गटाने हिंगोलीचा गड कायम राखला.
शिरुर लोकसभा मतदारसंघ
– राज्यातील हायव्होल्टेज मतदारसंघांमध्ये समावेश असलेल्या शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या (Amol Kolhe) अमोल कोल्हे यांनी अजितदादा गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. (Election Results) मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली होती. एकदाही शिवाजीराव आढळराव पाटील यांना एकाही फेरीत आघाडी घेता आली नाहीत. अखेर अमोल कोल्हे यांनी तब्बल 70 हजारांच्या मताधिक्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला.
– ठाकरेंच्या आणखी एका शिलेदारानं विजयी पताका फडकावली आहे. शिंदेंच्या रवींद्र वायकरांचा 2 हजार मतांनी पराभव करून (Amol Kirtikar) अमोल कीर्तिकरांनी लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. तब्बल 2 हजार मतांनी अमोल कीर्तिकरांचा विजय झाला आहे.
दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ
– दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे सकाळी 11 वाजेपर्यंतचे कल हाती आले होते. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार (Anil Desai) अनिल देसाई यांनी सध्या मोठी आघाडी घेत विजय मिळवला आहे. तर, शिंदे गटाच्या राहुल शेवाळेंचा दारुण पराभव झाला आहे. ठाकरेंचा मुंबईतील हा पहिला विजय (Election Results) आहे. मुंबई-दक्षिण-मध्य लोकसभा निवडणूक मतदारसंघातून अनिल देसाई यांचा ५३ हजार ३८४ मतांनी विजय झाला आहे.