मुंबई (Maharashtra Election Results) : महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha election) अंतर्गत पाच टप्प्यात निवडणुक (election Results) पार पडली. देशभरातील लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी महाराष्ट्रात 48 जागांचा समावेश आहे. येथे NDAचा एक भाग असलेल्या महायुती आघाडी, तर इंडिया आघाडीचा भाग असलेल्या महाआघाडीशी स्पर्धा आहे. या स्पर्धेत कोण आघाडीवर ते जाणून घेऊया…
महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या (Maharashtra election Results) निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र हे लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेले राज्य आहे. यासोबतच निवडणुकीचे निकालही खास आहेत. कारण राज्यातील दोन मोठे पक्ष उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे निवडणुकीपूर्वी (election Results) दोन गटात विभागले गेले आणि महाराष्ट्रात दोन नवे गट पडले, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली.
भाजपने प्रतिनिधित्व केलेल्या महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. विरोधी महाआघाडीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना यूबीटी, शरद पवार यांची NCP आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. (Maharashtra election Results) महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांवर, भाजप 15 जागांवर, काँग्रेस 6, शिंदे यांची शिवसेना 9 आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना 8, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर आहे.
आज सुरु असलेल्या निकालाच्या आकडेवारीनुसार, महायुती आघाडी 17 जागांवर, तर महाआघाडी 30 जागांवर आघाडीवर आहे. विदर्भात भाजप 02, काँग्रेस 05, शिंदे 01, ठाकरे 01, शरद पवार गट 01 या जागांवर विजय मिळवला आहे.
नागपूर लोकसभा मतदार संघ
नितीन गडकरी भारतीय जनता पार्टी – 437267
विकास ठाकरे इंडियन नॅशनल काँग्रेस – 359308
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ
काँग्रेस- प्रशांत पडोळे – 302024
भाजपा- सुनील मेंढे – 293998
गडचिरोली – चिमूर लोकसभा
1) डॉ. नामदेव किरसान (काँग्रेस ) – 614610
2) अशोक नेते ( भाजपा ) – 474376
अकोला लोकसभा मतदारसंघ मतमोजणी
अनुप धोत्रे -भाजपा-. 4,53,866
अभय पाटील कांग्रेस-. 4,13,854
प्रकाश आंबेडकर वंचित 2,74,823
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ
1) प्रतिभा धानोरकर (काँग्रेस ) : 716635
2) सुधीर मुनगंटीवार ( भाजपा) : 456943
वर्धा लोकसभा मतदारसंघ
रामदास तडस 384940
अमर काळे. 441817
अमरावती लोकसभा मतदारसंघ
नवनीत राणा – 506546
बळवंत वानखडे – 526271
यवतमाळ – वाशीम मतदारसंघ
राजश्री पाटील – 392839
संजय देशमुख- 458905
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
भाजपा उमेदवार – डॉ हिना गावित – 586878
कॉग्रेस उमेदवार – अँड गोवाल पाडवी – 745998
जळगाव लोकसभा मतदारसंघ
स्मिता वाघ भाजप – 536630
करण पवार शिवसेना ठाकरे गट- 336452
रामटेक लोकसभा मतदारसंघ
1. राजू पारवे (सेना) – 314870
2. शाम बर्वे (काँग्रेस) -367626
परभणी लोकसभा मतदारसंघ
1) संजय बंडु जाधव – 349839
2) महादेव जानकर – 257201
रावेर लोकसभा मतदारसंघ
1. रक्षा खडसे ( भाजप ) – 579973
2. श्रीराम पाटील ( शरद पवार गट राष्ट्रवादी ) – 327988
धुळे लोकसभा मतदारसंघ
भाजपचे डॉ . सुभाष भामरे 4 लाख 89 हजार 687 मते
काँग्रेस च्या डॉ. शोभा बच्छाव 4 लाख 97 हजार 657 मते
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
१) अॅड. गोवाल पाडवी, काँग्रेस – ५८३४१५
२) डॉ. हिना गावित, भाजपा- ४३००२५
बीड लोकसभा निवडणुक 2024
पंकजा मुंडे- 470413
बजरंग सोनवणे- 446052
लातूर लोकसभा मतदारसंघ
काँग्रेस डॉ.शिवाजी कळगे -501560
भाजप सुधाकर श्रांगरे -445391
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ (छ.संभाजीनगर)
चंद्रकांत खैरे UBT SS-111564
संदीप पान भुमरे SHIV S –189453
सय्यद इम्तियाज जलील – 167640
नांदेड लोकसभा मतदारसंघ
1) वसंतराव चव्हाण (काँग्रेस) -329357
2) प्रतापराव पाटील चिखलीकर (भाजप) -322888