मुंबई (Maharashtra Elections 2024) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 14 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यापूर्वी (Maharashtra Elections 2024) काँग्रेसकडून उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये (Congress) चंद्रपूरमधून प्रवीण पडवेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर बल्लारपूरमधून संतोषसिंग रावत, वरोरामधून प्रवीण सुरेश काकडे, उमरेडमध्ये संजय मेश्राम आणि आरमोरीमधून रामदास मसरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
या यादीमध्ये पक्षाने अंधेरी पश्चिम आणि औरंगाबाद पूर्व जागेवरील उमेदवार बदलले आहेत. (Congress) काँग्रेसने यापूर्वी सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिममधून तिकीट दिले होते. आता त्यांच्या जागी अशोक जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासोबतच औरंगाबाद पूर्व जागेवर मधुकर किशनराव देशमुख यांच्या जागी लहू शेवाळे यांना तिकीट देण्यात आले आहे. तर नांदेड उत्तरमधून अब्दुल सत्तार अब्दुल गफूर आणि नालासोपारा येथून संदीप पांडे यांना तिकीट देण्यात आले आहे.
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित 'केंद्रीय चुनाव समिति' की बैठक में महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए कांग्रेस उम्मीदवारों की लिस्ट। pic.twitter.com/F7Hw3SMn3L
— Congress (@INCIndia) October 27, 2024
काँग्रेसची चौथी यादी जाहीर
१ . अमळनेर -अनिल शिंदे
२ . उमरेड – संजय मेश्राम
३ . अरमोरी- रामदास मसराम
४ . चंद्रपूर- प्रवीण पडवेकर
५ . बल्लारपूर – संतोषसिंग रावत
६ . वरोरा -प्रवीण सुरेश काकडे
७ . नांदेड उत्तर – उब्दुल सत्तार
८ . औरंगाबाद पूर्व – लहू शेवाळे
९ . नालासोपारा – संदीप पांडे
१ ० . अंधेरी पश्चिम – अशोक जाधव
१ १ . पंढरपूर – भगिरथ भालके
१ २ . सोलापूर दक्षिण- दिलीप माने
१ ३ . शिवाजीनगर – दत्तात्रय बहिरट
१ ४ . पुणे कॅटोन्मेट – रमेश बागवे