महाराष्ट्र (Maharashtra Elections) : महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान पूर्ण झाले. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडल्या असून शनिवारी (२३ नोव्हेंबर) मतमोजणी होणार आहे. यावेळच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या संपूर्ण राज्यात (Maharashtra Elections) निवडणूक आयोगाकडून यासाठीची तयारी सुरू झाली आहे. मतमोजणी प्रक्रिया कशी असणार? याबाबत जाणून घ्या.
12/ 14
Maharashtra – Exit Poll – Preferred CM#MaharahstraElection2024 #Election2024 #ExitPolls pic.twitter.com/ZVMbrdqqQ7
— Axis My India (@AxisMyIndia) November 21, 2024
महाविकास आघाडी (एमव्हीए) देखील आपले सरकार स्थापन करण्याबाबत आत्मविश्वासू दिसत आहे. त्याचबरोबर ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्येही (Maharashtra Exit Poll 2024) महायुतीचा दणदणीत विजय दिसून आला आहे. तो 48 टक्के मतांनी विजयी झाल्याची माहिती आहे. त्याच वेळी, MVA मध्ये 37 टक्के आणि VBA मध्ये तीन टक्के आणि इतरांमध्ये फक्त 12 टक्के आहे.
अशी होते मतांची मोजणी:
* आठ वाजता मतमोजणीला सुरुवात.
* एक फेरी साधारण पंधरा मिनिटांत पूर्ण होईल
* दुपारी बारापर्यंत टपाली मोजणी पूर्ण होवून दोन ते तीनपर्यंत संपूर्ण मतमोजणी पूर्ण होण्याचा अंदाज
* मतमोजणीसाठी (Maharashtra Elections) कर्मचाऱ्यांची नियुक्ती
* मतमोजणीपूर्वी उमेदवारांच्या समोर मशिनचे सील काढण्यात येईल
* मतमोजणी केंद्रांवर मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नाही.
* प्रत्येक उमेदवाराचा प्रतिनिधी प्रत्येक टेबलवर असेल
* पहिल्यांदा टपाली मतांची मोजणी होणार. त्यानंतर मतदान यंत्रातील मतांची मोजणी होणार
* मतदारसंघातील पाच मतदान केंद्राच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठयांची मोजणी
* व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठीतील मते आणि मतदान यंत्रातील (इव्हीएम) मतांची पडताळणी होणार