नवी दिल्ली/मुंबई () : काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती आघाडीवर (Mahayuti government) आरोप केला आहे की, विकासाच्या नावाखाली राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या छताचा काही भाग मुसळधार पावसात खराब झाल्याच्या नुकत्याच घडलेल्या घटनेसह अनेक पायाभूत सुविधांमधील बिघाडांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.
रेल्वे स्टेशनच्या घटनेव्यतिरिक्त, प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष आणि गैरव्यवस्थापनाच्या इतर चिंताजनक लक्षणांकडेही लक्ष वेधले आहे. मुंबई-नाशिक महामार्ग पूर्णपणे कार्यान्वित नसूनही 500 हून अधिक खड्डे आणि भेगा पडलेल्या आहेत. याशिवाय सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर लगेचच कोसळल्याचा आणि 18,000 कोटी रुपये खर्चाच्या अटल सेतू प्रकल्पाला जोडलेल्या रस्त्याला कथित तडे गेल्याचा उल्लेख त्यांनी केला.
महाराष्ट्र में रत्नागिरी स्टेशन की छत उद्घाटन से पहले ही ढह गई। उधर, मुंबई-नासिक हाईवे जो अभी पूरी तरह तैयार भी नहीं हुआ, उसमें 500 से ज्यादा गड्ढे और दरारें पड़ गईं।
इससे पहले सिंधुदुर्ग में छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति उद्घाटन के कुछ ही महीने में ढह गई थी। मुंबई में 18… pic.twitter.com/wIIoV3tE8b
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 7, 2024
प्रियांका (Priyanka Gandhi) यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपली टीका शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर घडलेल्या घटनेचा विशेष उल्लेख केला आहे. ‘महाराष्ट्रातील रत्नागिरी स्टेशनचे छत उद्घाटनापूर्वीच कोसळले’, असा आरोप त्यांनी केला. त्याने Xवर पोस्ट केले आहे.
काँग्रेसच्या सरचिटणीसांनी महाराष्ट्र सरकारवर आरोप करत, ते ‘कुटिल आणि फसवे’ सरकार आहे. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांबाबत (Mahayuti government) महाराष्ट्र सरकारच्या दुर्लक्षाशी संबंधित हे आरोप प्रियांका गांधी यांनी राज्यात (Maharashtra Elections) विधानसभा निवडणुका जाहीर होत असताना केल्या आहेत.
चुवाव आयोग येत्या काही दिवसांत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतो. या (Maharashtra Elections) निवडणूका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. (Lok Sabha elections) लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद पवार) आणि शिवसेना (UTB) यांनी सत्ताधारी महाआघाडीपेक्षा चांगली कामगिरी केली होती आणि त्यामुळे (Assembly elections) विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस आशावादी दिसत आहे.