मुंबई (Maharashtra Farmers) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. (Farmers’ loans) शेतकऱ्यांच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. बीड जिल्ह्यात किसान क्रेडिट कार्ड जन समर्थन (Digital Project) डिजिटल प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही घोषणा केली. CM एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा; मुलींना मिळणार 1 लाख रुपये
CM शिंदे यांची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचे हितचिंतक असून, सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल क्रांतीचा शेतकऱ्यांसाठी वापर करण्याच्या डिजिटल प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडून आला आहे. (PM Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल प्रकल्पाचा उद्देश शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी (Digital technology) डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणे हा आहे. सरकार हे सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांचे आहे. अतिवृष्टी आणि गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी सरकारच्या मदतीवर त्यांनी भर दिला. मुलींच्या लग्नासाठी सरकार देणार पैसे; जाणून घ्या कोणाला होणार फायदा?
1 लाख 60 हजार रुपयांपर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, भारत हा प्रामुख्याने शेतीवर आधारित देश असून, शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून योजना आखल्या जातात. गेल्या दीड वर्षात शेतकऱ्यांना 45 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. याशिवाय 120 सिंचन प्रकल्प सुरू करण्यात आले असून, त्यामुळे राज्यातील 15 लाख हेक्टर (Land irrigation) जमीन सिंचनाखाली येणार आहे.