हिंगोली (Maharashtra Home Guard) : जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य होमगार्ड संघटनेचा 78 वा वर्धापन दिन जिल्ह्याचे जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 13 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीत साजरा करण्यात आला आज दि. 19 डिसेंबर रोजी समारोप कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे केंद्र नायक नानासाहेब मोखडे तर प्रमुख पाहुणे म्हणून शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडाळकर व जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी वैशाली डावरे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र नायक यांनी संघटनेचा पूर्व इतिहास सांगून शुभेच्छा संदेश वाचून (Maharashtra Home Guard) होमगार्डने भविष्यात शिस्त पाळावी व कर्तव्यावर असताना संघटनेचे नाव लौकिक होईल असे कर्तव्य करावे तर सूत्रसंचालन हिंगोली पथकाचे अंशकालीन लिपिक तथा वरिष्ठ पलटन नायक हरिशंकर जोशी यांनी केले त्यानंतर काही होमगार्डचे मनोगत झाले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वसमत पथकाचे समादेशक अधिकारी शेख चांदपाशा कळमनुरी पथकाचे समादेशक अधिकारी विश्वनाथ बेद्रे कंपनी नायक संजय वसिया राजकुमार बांगर वरिष्ठ पलटन नायक भागवत देवरे ,विठ्ठल राऊत, दीपमाला वाडे, फलटण नायक शंकर कांदे, वामन मगर, शंकर कंठे ,द्रुपदा जयस्वाल, सुनील मुनेश्वर ,वीरभद्र संगेकर, संतोष दुबाकलू ,प्रभाकर मुंडे ,अशोक बांगर, सुनिता जाधव, जवान विजय राटनालू ,भारत मूल्यालू, यशवंत मोरे ,गणेश ढेंबरे ,नामदेव गायकवाड, शेख नूर जहा ,शेख मुमताज, राधा ढगे ,वर्षा दांडेगावकर, सुवर्णमाला तपासे ,शितल बलखंडे, त्रिशीला खंदारे ,ओंकार अवचार, शंकर अवचार, सुरक्षा गार्ड रामकिशन कोरडे, संदीप जाधव , बाळू शिरसागर, गजानन घोळवे , धुरपत हेंद्रे, शेख मोबीन, पंडित जाधव या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम करून यशस्वी केला आहे. यावेळी या कार्यक्रमाचे आभार हिंगोली पथकाचे फलटन नायक शंकर कांदे यांनी व्यक्त केले यानंतर सर्वांनी भोजनाचा स्वाद घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.