हिंगोली (Maharashtra Kesari) : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने हिंगोली जिल्हा (wrestling competition) कुस्तीगीर संघ यांच्या मार्गदर्शनाने 67 वी महाराष्ट्र केसरी हिंगोली जिल्हा निवड चाचणी वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी व माती 67 वी महाराष्ट्र किताब लढत 2024-25 कुस्ती स्पर्धा शहरातील रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती भानुदास ग्यानोजी पवार , सुरेश भाऊराव वंजारी जेस्दनवाला , माजी नगर सेवक श्रीराम लक्ष्मण बांगर, पहेलवान भारत चौधरी, पहेलवान गोविंद खंडेलवाल, पहेलवान शेख नफीज संजय मांडगे, मधुकर शिन्दे, गोपाल मोठे, नागेश बोराटे शिरपुर ,परमेश्वर मांडगे पहेलवान, प्रा. संदिप लोंढे, रमेश गंगावने, पवन मंडले, उद्धव पवार पहेलवान, आदींची प्रमुख उपस्थीत होते.
घेण्यात आलेल्या (Maharashtra Kesari) निवड चाचणीत माती विभाग: 57 किलोगट मध्ये आदित्य रहाटे खुडज, 61 किलो गट मध्ये सुर्यकांत सानप 65 किलो गट मध्ये सोनाजी खुडज, 70 किलो गट मध्ये कृष्णा देशमुख 74 किलो गट मध्ये अविनाश जाधव, 79 किलो गटात अविनाश गुठ्ठे 86 किलो गट मध्ये ऋषीकेश काचगुंडे, 92 किलो गट मध्ये प्रदिप माघाडे 97 किलो गट मध्ये शेषराव काचगुंडे यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र केसरीसाठी (Maharashtra Kesari) प्रथम क्रमांक पवन खंडेलवाल यांची निवड झाली आहे. तर गादी (wrestling competition) कुस्ती विभागात 57 किलो गटात परमेश्वर काळे 61 किलो गटात पहेलवान शिवदास बोंगाने, 65 किलो गट मध्ये पहेलवान चैतन्य नागरे, 70 किलो गटात पहेलवान आशिष कुरिल, 79 किलो गट मध्ये पहेलवान हनवंतराव भुतनर, 86 किलो गटात पहेलवान प्रदिप मांडगे, 92 किलो गटात पहेलवान बालाजी बेले, 97 किलो गट मध्ये पहेलवान शंकर शिंदे, गादी विभागात महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) गटासाठी पहेलवान हनुमान निरगुडे यांची निवड झाली आहे.
पंच म्हणून वाशिम जिल्ह्याचे पहेलवान पुरूषोत्तम तुपसांडे यांनी काम पाहिले. या (Maharashtra Kesari) कुस्ती स्पर्धेचे (wrestling competition) आयोजक हिंगोली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पहेलवान भरत चौधरी हे होते. कुस्ती निवड स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशाल व्यायाम शाळा, राजस्थान व्यायाम शाळेतील सर्व पहेलवानांनी परिश्रम घेतले.