अरबी समुद्रातील बेटावर असलेला खांदेरी किल्ला
मुंबई (Maharashtra Khanderi fort) : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाबाबत (Historical legacy) राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. अरबी समुद्रात बेटावर असलेला खांदेरी (Khanderi fort) किल्ला सरकारने संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. संरक्षित स्मारक घोषित झाल्यानंतर वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेल्या या सागरी किल्ल्याचे संवर्धन करण्याचे अधिकार पुरातत्व विभागाला मिळणार आहे. त्यानंतर या (Maharashtra fort) किल्ल्याचे पुनरुज्जीवन आणि देखभाल तर होईलच, शिवाय पर्यटकांचा ओघही वाढणार आहे. अरबी समुद्रातील बेटावर असलेल्या खांदेरी किल्ल्याला राज्य सरकारचे संरक्षित स्मारक म्हणून पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने अधिसूचना जारी केली आहे.
खांदेरी किल्ल्याचे संवर्धन पुरातत्व विभाग करणार
महाराष्ट्र सरकारच्या (CM Eknath Shinde) या निर्णयामुळे खांदेरी किल्ल्याचा (Khanderi fort) समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक महत्त्व भावी पिढ्यांसाठी जपले जाणार आहे. राज्य पुरातत्व विभाग (Archaeology Department) आता त्याच्या संवर्धनाच्या प्रयत्नांवर देखरेख करणार आहे. खांदेरी किल्ल्याचे सागरी सुरक्षेचे महत्त्व समजून (Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराजांनी 1672 मध्ये या निर्जन बेटाला मजबूत करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यावेळी झालेल्या विरोधामुळे ते काम पूर्ण झाले नाही. नंतर 1679-80 च्या दरम्यान, ब्रिटिश, पोर्तुगीज, मुघल आणि सिद्धी यांच्या प्रतिकारांवर मात करून त्यांनी किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले.
जाणून घ्या खांदेरी किल्ल्याचा इतिहास
छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत खांदेरी किल्ला (Khanderi fort) मराठा साम्राज्याचा (Maratha Empire) एक महत्त्वाचा नौदल तळ बनला. सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांनी मराठा सैन्याचा विस्तार करून कोकण किनारपट्टीवर आपला प्रभाव वाढवला. कोकणातील सागरी वाहतुकीवर त्यांचे नियंत्रण सर्व सागरी कामांसाठी आवश्यक होते. 12 नोव्हेंबर 1719 रोजी ब्रिटीश आणि पोर्तुगीजांनी संयुक्त हल्ला केला. परंतु कान्होजींनी यशस्वीपणे किल्ल्याचे रक्षण केले. (Maharashtra fort) मुंबईकडे जाणाऱ्या जहाजांवर लक्ष ठेवण्यात या किल्ल्याची महत्त्वाची भूमिका होती. तथापि, 1818 मध्ये ब्रिटिशांनी ते ताब्यात घेतले.
खांदेरी किल्ल्याचे वैशिष्ट्ये
खांदेरी किल्ला सुमारे 6 हेक्टरमध्ये पसरलेला असून त्याच्या भिंती रुंद आहेत. त्याला 21 बुरूज आणि दोन दरवाजे आहेत. महाव्दार दरवाजा उद्ध्वस्त झाला आहे. पश्चिमेकडील चोर दरवाजा शाबूत आहे. (Khanderi fort) किल्ल्यावर चार विहिरी आणि जुन्या इमारतींचे अवशेषही आहेत.
हे कोळी समाजाचे तीर्थक्षेत्र
खांदेरी किल्ल्यावर एक दीपगृह आहे, जे कोळी समाजासाठी तीर्थक्षेत्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक महत्त्व (Historical significance) असूनही अनेक वर्षांपासून हा (Khanderi fort) किल्ला दुर्लक्षित होता. आता महाराष्ट्र प्राचीन स्मारके, पुरातत्व स्थळे (Maharashtra fort) आणि अवशेष अधिनियम 1960 अंतर्गत संरक्षित स्मारक म्हणून घोषित केल्याने, त्याची अत्यंत आवश्यक देखभाल आणि दुरुस्ती करण्यात येणार आहे.