मुंबई (Maharashtra Legislative Council) : विरोधीपक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांना विधिमंडळाच्या तृतीय अधिवेशनातील 5 दिवसासाठी आज निलंबित करण्यात आले. त्यांच्यावर सभागृहात गैरवर्तन करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तीन वेळा कामकाज तहकूब केल्यानंतर दुपारी 2 वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाई नंतर दानवे यांना पुढील पाच दिवस विधिमंडळाच्या कामकाजात सहभाग घेता येणार नाही.
कारवाई न्याय्य, योग्य आणि उचित: उपसभापती नीलम गोऱ्हे
माहितीनुसार, काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत भाषण देताना हिंदू समाजाचा अपमान केला या विषयावरून सोमवारी (Maharashtra Legislative) विधान परिषद सभागृहात प्रसाद लाड आणि विरोधी पक्षात खडाजंगी झाली होती. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांचा तोल सुटला. त्यांनी प्रसाद लाड यांच्याकडे पाहून महिलांना लाज येईल अशी शिवी दिली. यावेळी सभागृहात उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) उपस्थित होत्या. त्यांच्यासमोर हा प्रकार घडल्यामुळे मोठी कारवाई होईल असे अपेक्षित होते. त्यानुसार ही कारवाई झाली. कारवाई होण्यापूर्वी मात्र सभागृहाचे 3 तास कामकाज होऊ शकले नाही. दुपारी दोन वाजता कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी निलंबनाचा ठराव मांडला. त्यात त्यांनी अंबादास दानवे यांच्यावर सभागृहात गैरवर्तन करण्याचा ठपका ठेवला. कारवाई केली नाही तर चुकीचा पायंडा पडेल असे ठरावात म्हटले गेले आहे.
उपसभापती नीलम गोऱ्हे झाल्या कठोर
दरम्यान, पाच दिवसाच्या निलंबनाची कारवाई झाल्यानंतर सत्ताधारी सदस्यांनी बाके वाजवून कारवाईचे स्वागत केले. यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी दानवे (Ambadas Danave) यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी द्यावी अशी मागणी केली. यावर सभागृहात उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आक्षेप घेतला. कारवाई झालेल्या सदस्याला बोलण्यास परवानगी देण्याचा प्रघात आजपर्यंत झालेला नाही. त्यामुळे बोलण्यास परवानगी देण्यात येऊ नये अशी सूचना उपसभापती यांना केली. सदर सूचना उपसभापती यांनी मान्य केली. दानवे यांना बोलण्यास परवानगी नाकारल्यामुळे विरोधी पक्षाने उपसभापती गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्यावर पक्षपाताचा आरोप लावला. बहुमताच्या जोरावर कारवाई करण्याचा आरोप अनिल परब यांनी सभागृहात लावला.
निलंबनाचा प्रस्ताव मंजूर करताना उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांच्या वर्तणुकीवर खेद व्यक्त केला. महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असे (Maharashtra Legislative) विरोधी पक्ष नेत्याचे वर्तन होते. घटना घडून गेल्यावर त्यावर मीडिया समोर समर्थन करणे हे अत्यंत चुकीची आहे. ही दर्पोक्ती कुठून येते? असा प्रश्न त्यांनी सभागृहाला विचारला. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आपल्या सदस्यांच्या वर्तनाकडे लक्ष द्यावे असा सल्ला त्यांनी दिला. हा सर्वोच्च सभागृहाच्या अवमान आहे. कारवाई केली नाही तर चुकीचा पायंडा पडेल. त्यांच्यावर झालेली कारवाई न्याय्य, योग्य आणि उचित आहे, अशा शब्दात नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी कारवाईचे समर्थन केले.