मुंबई (Maharashtra Legislative Council): विधान परिषदेतील मुस्लिम प्रतिनिधित्व येत्या 27 जुलै रोजी संपूर्णपणे संपुष्टात येणार आहे. राष्ट्रवादी(अप) गटाचे बाबा दुर्राणी आणि काँग्रेसचे वजाहत मिर्झा या महिन्याच्या शेवटी निवृत्त होत आहेत. त्यानंतर राज्याच्या वरिष्ठ सभागृहात मुस्लिम समुदायातील कोणताच (Muslim representation) व्यक्ती प्रतिनिधित्व करताना दिसणार नाही.
राज्यात 12 टक्के मुस्लिम लोकसंख्या असल्याचे सांगितले जाते. राज्य अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत 567 खासदार निवडून आले आहेत. यापैकी आतापर्यंत फक्त 15 मुस्लिम खासदारांनी राज्याचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. हे प्रमाण 2.5 टक्के एवढे अल्प आहे. (Maharashtra Legislative Council) लोकसंख्येच्या प्रमाणात मुस्लिम समुदायाला राज्यात प्रतिनिधित्व मिळत नाही, अशी खंत समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख व्यक्त केली आहे. विधान सभेत बोटावर मोजण्याइतके (Muslim representation) मुस्लिम समुदायातील लोक निवडून येतात असे ते म्हणाले आहे.
नुकत्याच झालेल्या (Lok Sabha Elections) लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समुदायाने महाविकास आघाडीला भरभरून मतदान केले आहे. यामुळेच ‘मविआ’ ला राज्यात 31 जागा मिळवता आल्या. सध्या राज्यात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. लोकसभा निवडणुकीत दिलेल्या सहकार्याची पावती म्हणून मुस्लिम समुदायाला माविआकडून (Maharashtra Legislative Council) विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र विधान परिषदेत (Muslim representation) मुस्लिम प्रतिनिधित्व संपुष्टात येत असताना निवडणुकीत मुस्लिम समुदायाला उमेदवारी देण्यात आली नाही. याची जाहीर खंत मुस्लिम आमदार रईस शेख यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे व नाना पटोले यांना पत्र लिहून व्यक्त केली आहे. असाच व्यवहार मुस्लिम समुदाय विषयी राहिला तर समाज ओवेसिकडे वळेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.