कारंजा/वाशिम (Medical Emergency) : राष्ट्रीय आरोग्य अभियान (Ministry of Public Health) व सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील जनसामान्यांसाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. जानेवारी 2014 साली या सेवा प्रकल्पाचे काम पुणेस्थित भारत विकास ग्रुप या कंपनीकडे सोपविन्यात आले. संपूर्ण राज्यात एकूण 937 रुग्णवाहिकामार्फत (Medical Emergency) या सेवेला सुरुवात झाली.
या प्रकल्पास “महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा” असे नाव देऊन राज्यातील कोणत्याही ठीकाणावरून मोबाईल अथवा लॅन्डलाईन फोनवरून 108 हा क्रमांक डायल करताच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थीतीत रुग्णांना मोफत (Medical Emergency) व वेळेत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होते. एम. ई .एम. एस. ने 26 जानेवारी 2014 ला सेवा लाँच झाल्यापासून 30 जून 2024 पर्यंत वाशिम जिल्ह्यातील 1 लाख 31 हजार 237 आपत्कालीन रुग्णांना सेवा दिली आहे.
या सेवेने रुग्णांच्या तातडीच्या वैद्यकीय गरजा पूर्ण केल्या आहेत. जिल्हा शल्य चिकीत्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्याने विवीध वैद्यकीय जनजागृती कार्यक्रमांच्या माध्यमातून या सेवेची माहीती नागरिकापर्यंत पोहचवीण्यास मदत होत आहे. जिल्हाधिकारी व वैद्यकीय सेवा उप संचालक यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या मासिक आढावा बैठकांमधून त्यांना प्रकल्प कार्याची माहिती दिली जात असून, त्यावर येणाऱ्या सूचनांची अंमलबजावनी केली जाते. तसेच सूचनांनुसार केल्या गेलेल्या बदलांमुळे परिणामकारक रुग्णसेवा देण्यास मदत होत आहे.
108 द्वारे सेवा पुरविण्यात आलेल्यात अपघातग्रस्त वाहन, हल्ला, जळते, कार्डियाक ,पडणे, नशा व विषबाधा, प्रसुती व गर्भधारणा, लाईटनिंग व इलेक्ट्रोक्युशन, सामूहिक अपघात वैद्यकीय पॉलीटरामा, आत्महत्या व स्वतःला झालेली इजा आणि इतर रुग्णांचा समावेश आहे. शिवाय महिलांची प्रसूती आणि व्हेंटिलेटरवरील रुग्णांना देखील या सेवेचा लाभ मिळाला आहे. सेवेला सुरुवात झाल्यापासून दरम्यानच्या काळात रस्ते अपघात, हृदयविकार, गरोदर माता, इतर वैद्यकीय कारण या व अशा प्रकारच्या रुग्णांना सेवा (Medical Emergency) देण्याची उपलब्धी या प्रकल्पाने साध्य केली आहे.
प्रकल्यातील रुग्णवाहीकांवर कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी तसेच रुग्णवाहीका चालक यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या या अविरत सेवेबद्दल जनतेकडून व लोकप्रतिनिधींकडून त्यांचे कौतुक होत आहे. सन 2020 च्या कोरोना महामारीच्या काळात डायल 108 रुग्णवाहिका सेवेत कार्यरत असणारे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून दिलेली रुग्णसेवा (Medical Emergency) ही कौतकप्राप्त आहे. जिल्हा प्रशासनांतर्गत पोलीस दल, अग्निशमन दल ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या बरोबर सुयोग्य समन्वय साधत उद्भवनाऱ्या प्रत्येक आपत्ती प्रसंगी या रुग्णवाहिकेने आपली रुग्णसेवा बजावली आहे.