हिंगोली (Raj Thackeray) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) उद्या हिंगोलीत येत आहेत. नवनिर्माण यात्रेनिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ते गुरूवार व शुक्रवार दोन दिवस हिंगोलीत राहणार आहेत. (Assembly Elections) विधानसभा निवडणुकांच्या पृष्ठभूमिवर राज ठाकरे यांच्या मराठवाड्यातील नवनिर्माण यात्रेदरम्यान ते पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या निवडणुकीत मनसे राज्यभर उमेदवार उभे करणार असल्याने राज ठाकरे यांच्या दौर्याबाबत सर्वसामान्यांतही मोठे कुतूहल आहे.
हिंगोलीतील दोन दिवसांच्या मुक्कामात ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. जिल्ह्यातील समस्या व महत्वाच्या प्रश्नांची माहिती (Raj Thackeray) राज ठाकरे यांनी आधीच घेतली असून याच सर्व विषयांवर ते संवाद साधणार आहेत. याशिवाय जिल्ह्यातील आपल्या काही जुन्या परिचितांची व विविध क्षेत्रातील विशेष व्यक्तींशी सुद्धा राज ठाकरे संवाद साधणार असल्याची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी दिली आहे. संभूस हे मागील तीन दिवसांपासून नवनिर्माण यात्रेच्या तयारीसाठी हिंगोलीत तळ ठोकून आहेत. त्यांच्या सोबत बंडू कुटे, दिपक वडकुते, अजिंक्य घुगे या पदाधिकार्यांसहीत अन्य कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.
सडेतोड वक्तव्यासाठी ओळखल्या जाणारे राज ठाकरे (Raj Thackeray) तब्बल बारा वर्षानंतर हिंगोलीत येत आहेत. (Assembly Elections) लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या समर्थनाची भूमिका घेणार्या राज ठाकरेंची ‘…लाव रे तो व्हिडीओ…’ स्टाईल जनतेच्या अजूनही स्मरणात आहे. या दौर्यात त्यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
‘खळ्ळ…खट्याक’ ची प्रशासनाला भिती
राज ठाकरे विश्रामगृहात मुक्कामी राहणार असल्याने सा.बां. विभागातर्फे मोठी तयारी करण्यात आली आहे. कोणतेही संवैधानिक पद नसताना (Raj Thackeray) राज ठाकरेंचा दरारा मोठा असल्याचे या तयारीतून दिसून येत आहे. हेरीटेज गेस्ट हाऊस सज्ज नवनिर्माण यात्रेनिमित्त निजामकालीन हेरीटेज गेस्ट हाऊस सज्ज झाले आहे.