विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
मुंबई (Maharashtra Sadan) : दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात राजर्षी शाहू महाराजांचा (Rajarshi Shahu Maharaj) नवीन पुतळा बसवला आहे. यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने लक्ष घालावे आणि आधी जसा होता तसाच पुतळा बसवावा, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते (Vijay Wadettiwar) विजय वडेट्टीवार यांनी केली. राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडला त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र सदनातील (Rajarshi Shahu Maharaj) राजर्षी शाहू महाराजांच्या वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शाहू महाराजांचेच वंशज संसदेत खासदार झाले आहेत. त्यांचेही मत याबाबत घेतले जाईल. याबाबत आम्ही तपासून दुरुस्ती करू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले.