नांदेड (Nanded ITI Exam) : महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्या बांधकाम पर्यवेक्षकाच्या परिक्षेत असंख्य चुका असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दरम्यान आयटीआय केंद्र (ITI Centre) असलेल्या ठिकाणी सदर परिक्षा घेण्यात येत असताना एकच गोंधळ उडाला. पहिल्या प्रश्नपत्रिकेत दोन तासाच्यानंतर दुरूस्ती करून दुसरी (ITI Exam) प्रश्नपत्रिका देण्यात आल्यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले.
विद्यार्थी गोंधळल्याने पुन्हा परिक्षा घेण्याची मागणी
आयटीआय येथे गुरूवारी २० जून रोजी दुपारी २ वाजता बांधकाम पर्यवेक्षकचा प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी काही प्रश्न देखील सोडविले. दोन तासाचा कालावधी उलटून गेल्यानंतर संबंधित बोर्डाला चुका लक्षात आल्यानंतर एैनवेळी विद्यार्थ्यांना दुसरी प्रश्नपत्रिका (ITI Exam) देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांनी परिक्षा केंद्रप्रमुखांना पहिल्या प्रश्नपत्रिकेबाबत जाब विचारला. त्यावेळी केंद्रप्रमुख आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली. परिक्षा रद्द करून पुन्हा परिक्षा घेण्यात यावी, अशी मागणी केली. दरम्यान विद्यार्थी यासंदर्भात लवकरच जिल्हाधिकार्यांना निवेदन देणार असल्याचे परिक्षार्थी परमेश्वर पाटील यांनी यावेळी सांगितले.
बोर्डाकडून (Maharashtra State) पहिल्या प्रश्नपत्रिका दुरूस्तीबाबत सूचना आली, त्यानुसार दुसरी प्रश्नपत्रिका (ITI Exam) देण्यात आलीअसून विद्यार्थ्यांना दोन तास वाढवून देण्यात आले. विद्यार्थ्यांची काही तक्रार असल्यास आपण बोर्डाला कळवू.
– सचिन सूर्यवंशी, परिक्षा केंद्रप्रमुख, तथा प्राचार्य आयटीआय नांदेड